sidharth malhotra and kiara advani  Sakal
मनोरंजन

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात 'या' दिग्दर्शकाची असणार खास हजेरी, हे अपडेट आले समोर

पाहुण्यांबद्दल बोलायचे झाले तर, हे कपल त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही खास मित्रांना लग्नासाठी आमंत्रित करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. या स्टार कपलच्या लग्नाशी संबंधित अपडेट्सची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल किंवा लग्नाबद्दल कधीही कोणतीही पुष्टी दिली नाही. पण त्यांच्या लग्नाची बातमी आगीसारखी पसरली होती, आता दोघेही लवकरच जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा दोघांनाही त्यांचे लग्न खूप इंटीमेट ठेवायचे आहे आणि म्हणूनच खूप कमी लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाहुण्यांबद्दल बोलायचे झाले तर, हे कपल त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही खास मित्रांना लग्नासाठी आमंत्रित करणार आहे.

यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांचा समावेश आहे. वृत्तानुसार, बॉलीवूडमधील काही निवडक पाहुणे जैसलमेरमध्ये सिड-कियाराचे कुटुंब आणि मित्रांना भेट देणार आहेत. आणि त्या यादीत सिद्धार्थच्या 'इंडियन पोलिस फोर्स'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीही सामील झाला आहे.

रोहितशिवाय फिल्म इंडस्ट्रीतील शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतही लग्नाला उपस्थित राहू शकतात. दोघेही या लग्नात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. करण जोहर, वरुण धवन आणि अश्विनी यार्दी यांसारख्या इतरांनाही लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की कियाराची सर्वात चांगली मैत्रीण ईशा अंबानी, जिने नुकतेच तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, ती लग्नाला उपस्थित राहू शकते.

याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मल्होत्राने या मोठ्या दिवसासाठी कियारा आणि सिडचे आउटफिट डिझाइन केले आहेत. डिझायनर मनीष मल्होत्राने ​सिड आणि कियारा यांच्या लग्नासाठी जवळपास 150 आउटफिट तयार केले आहेत. सर्व फंक्शन्ससाठी वधू आणि वर दोघेही मनीष मल्होत्राच्या क्रिएशन्स परिधान करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT