Yodha First Poster Release 
मनोरंजन

VIDEO : ‘योद्धा’ ची 'गगन भरारी'; दुबईत हटके पद्धतीनं पोस्टर झालं रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Yodha First Poster Release: धर्मा प्रोडक्शनने दुबईत 13 हजार फूट उंचीवरुन योद्धा या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे.

priyanka kulkarni

Yodha First Poster Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच 'योद्धा' (Yodha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच या चित्रपटाचे पोस्टर अखेर रिलीज झाले आहे. हे पोस्टर हटके पद्धतीनं रिलीज करण्यात आले आहे. धर्मा प्रोडक्शनने दुबईत 13 हजार फूट उंचीवरुन योद्धा या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि करण जोहरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एरियल स्टंट दिसत आहेत. दुबईमध्ये स्काय डायव्हिंग करुन योद्धा या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या व्हिडीओला सिद्धार्थ कॅप्शन दिलं, "थेट तुमच्या स्क्रीनवर थ्रिल्स एअरड्रॉपिंग! तुम्हा सर्वांसोबत या प्रवासाला निघताना खूप आनंद झाला. योद्धा हा चित्रपट 15 मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे."

पाहा व्हिडीओ:

सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही लोक स्काय डायव्हिंग करताना दिसतील. 5 जण विमानातून उडी मारतात. यातील तीन जण योद्धा चित्रपटाचे पोस्टर धरतात.तर दोघे एरियल स्टंट करतात.

सिद्धार्थनं योद्धा चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "योद्धा चित्रपटाचा टीझर 19 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. "

'योद्धा' ची स्टार कास्ट

योद्धा या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका मंदान्ना, राशी खन्ना आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT