Sidharth Shukla News 
मनोरंजन

Sidharth Shukla: सिद्धार्थच्या कुटूंबियांची कळकळीची विनंती, यापुढे...

सिध्दार्थच्या घरच्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना एक आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sidharth Shukla: टेलिव्हिजन मनोरंजन (Entertainment Industry) क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं गेल्या वर्षी निधन झालं. अल्पावधीतच त्यानं लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या सिद्धार्थच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अद्यापही चाहते त्याचं जाणं विसलेले नाहीत. त्याच्या मालिका आणि चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देण्याचे काम यावेळी चाहते करत असतात. आता सिद्धार्थ शुक्लाच्या घरच्यांनी सिद्धार्थच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना भावनिक आवाहन केलं आहे. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत. (Sidharth Shukla passed away)

काल सिध्दार्थच्या घरच्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपण जर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सिद्धार्थचं नाव वापरणार असाल तर त्यापूर्वी आमची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्याचं नाव यापुढे कोणत्याही कामात वापरायचे असल्यास त्यासाठी आमची परवानगी घ्यायला हवी. हे निवेदन सिद्धार्थच्या वतीनं त्याची जवळची मैत्रीण आणि बिग बॉसमधील माजी स्पर्धक शहनाज गिलनं (Shehnaz Gill) सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केलं आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे.

ते निवेदन प्रसिद्ध करताना शहनाजनं कोणत्याही प्रकारचे कॅप्शन लिहिलेलं नाही. त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सिद्धार्थच्या सर्व चाहत्यांना नमस्कार, आम्ही आपल्या सर्वांना सांगु इच्छितो की, आम्ही आपल्या भावनांचा आदर ठेवतो. तुमचं सिद्धार्थविषयी असणारं प्रेम समजु शकतो. मात्र काही गोष्टींचा आपण गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्याचं नाव वापरताना पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे. ज्यांना कुणाला सिद्धार्थचं नाव, त्याचा फोटो आपल्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी घ्यायचा असेल त्यांनी संबंधितांची परवानगी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT