Sidhu Moose Wala  esakal
मनोरंजन

Sidhu Moose Wala: "आमच्या कुटुंबाची काळजी करणाऱ्या..."; पत्नीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोस्ट

Sidhu Moose Wala: चरण कौर यांच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान आता सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Sidhu Moose Wala: काही दिवसांपूर्वी दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) कुटुंबाबत एक बातमी आली. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर (Charan Kaur) या वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्या आई होणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आता सोशल मीडियावर चरण कौर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशा बातम्या येत आहेत. चरण कौर यांच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान आता सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोस्ट

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बलकौर सिंह यांनी त्यांच्या कुटुंबाबत पसरणाऱ्या अफवांबद्दल लिहिलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं,"आमच्या कुटुंबाची काळजी करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. परंतु आम्ही विनंती करतो की, कुटुंबाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही बातमी असो, आमचे कुटुंब तुमच्या सर्वांसोबत शेअर करेल."

चरण कौर यांच्या प्रेग्नन्सीची अफवा सोशल मीडियावर का पसरत आहे ? बलकौर सिंह आणि चरण कौर हे खरंच आई-बाबा होणार आहेत का? असे प्रश्न आता नेटकऱ्यांना बलकौर सिंह यांच्या पोस्टनंतर पडले आहेत. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये चरण कौर यांच्या प्रेग्नन्सीचा उल्लेख केलेला नाही.

दोन वर्षापूर्वी सिद्धू मुसेवालाची झाली हत्या

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टममध्ये सिद्धूच्या शरीरावर 24 गोळ्यांच्या खुणा आढळल्या. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी 31 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

जाणून घ्या सिद्धू मुसेवालाबद्दल

सिद्धूच्या मृत्यूला दोन वर्ष झाली आहे पण आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात तो जिवंत आहे.सिद्धू मुसेवालाचा चाहता वर्ग मोठा आहे.फक्त देशतच नाही तर परदेशातही त्याचे चाहते आहेत. त्याच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले. सिद्धूचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू, असं होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT