Sidhu Moose Wala Latest News Sidhu Moose Wala Latest News
मनोरंजन

Sidhu Moose Wala : मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित ताब्यात

मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी अझरबैजानमध्ये

सकाळ डिजिटल टीम

Sidhu Moose Wala Latest News सिद्धू मुसेवाला हत्या (Sidhu Moose Wala) प्रकरणातील संशयिताला अझरबैजानमधून आणि दुसऱ्याला केनियामधून ताब्यात घेण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. भारत या दोन देशांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा अझरबैजानमधून शोध लावला आहे. केंद्रीय एजन्सींनी आरोपी सचिन थापन बिश्नोईला शोधण्यात राज्य पोलिसांना मदत केली. त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव म्हणाले.

सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येपूर्वी सचिन आणि आणखी एक आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई बनावट पासपोर्टद्वारे देशातून पळून गेले होते. सचिन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा आणखी एक सदस्य गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता.

त्याने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सुरुवातीला तो दुबईला पळून गेला होता. भारत सरकार आणि केंद्रीय यंत्रणांच्या पाठिंब्याने तो अझरबैजानमध्ये असल्याचे आम्हाला समजले. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, असेही गौरव यादव म्हणाले.

कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला आशा आहे की त्याला लवकरच भारतात आणले जाईल, असेही गौरव यादव म्हणाले. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी मुसेवाला हत्येप्रकरणी १,८५० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात एकूण ३६ पैकी २४ आरोपींची नावे देण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT