Sidhu Moose Wala murder mastermind Goldy Brar detained in US sakal
मनोरंजन

Goldy Brar Detained: सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला अटक

सिद्धू मुसेवाला हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गोल्डी ब्रारला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नीलेश अडसूळ

Goldy Brar Detained : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गेल्यावर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गोल्डी ब्रारनं या हत्येची जबाबदारी स्विकारली होती. परंतु तो परदेशात जाऊन बसला होता. अखेर गुप्तचर संघटनांनी त्याचा शोध घेत गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियातून अटक केली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली आहे. २९ मे 2021 रोजी सिद्धू मुसेवाला याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाबमध्ये ही थरारक घटना घडली होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली होती. अखेर या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

परदेशात बसूनच सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकाडांच कट गोल्डी ब्रारनं रचल्याचं बोललं जात आहे. त्यानंच आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यानं मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचं कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ३४ जणांना आरोपी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT