Sidhu Moosewala’s father receives death threat Esakal
मनोरंजन

'लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाचं नाव', सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकीचा ईमेल..

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेला अनेक दिवस झाले असले तरी या प्रकरणाचा शोध लागलेला नाही. मात्र सिद्धू मुसेवालानंतर आता त्याच्या घरचे हे सुरक्षित नाहीत. त्याचे वडिल बलकौर सिंग यांना वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी बलकौर सिंगला ईमेलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपी महिपाल राजस्थानमधील जोधपूरचा असून त्याला दिल्लीतील बहादूरगड येथून अटक करण्यात आली आहे.

त्यांनतर याच महिन्याच्या पाच तारखेला एका ईमेलद्वारे बलकौर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये त्यांना लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाचे नाव न घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. हा ईमेलही राजस्थानमधूनच पाठवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींची ओळख पटवली होती.

आता पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. त्याला राजस्थानमधून ईमेल पाठवून धमकी देण्यात आली आहे . धमकी मिळाल्यानंतर मानसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांची नावे समोर आली होती. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यानही लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की तो सिद्धू मुसेवालावर रागावला होता आणि त्याचा जवळचा मित्र गोल्डी ब्रारने मुसेवालाची हत्या केली. यांनतर त्याचे वडिल बालकौर सिंह यांनी येत्या काळात देशातील जे गुन्हेगार आहे त्यांना योगींनी शिक्षा घडवावी त्यांनी केलेल्या कामाची त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी असल्याचं सांगतिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT