Simi Garewal In Bigg Boss 16  Google
मनोरंजन

Bigg Boss 16: Top 3 मध्ये असतील 'हे' स्पर्धक, बोलता-बोलता सिमी ग्रेवालनी सांगून टाकली नावं...

बिग बॉस १६ च्या घरात सिमी ग्रेवाल यांनी एन्ट्री केली होती आणि स्पर्धकांसोबत बोलल्यानंतर त्यांनी आपले काही अंदाजही वर्तवले.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: बिग बॉस १६ चा नुकताच प्रसारित झालेला भाग खूपच मजेदार राहिला. या भागात स्पर्धकांच्या कुटुंबियांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावलेली पहायला मिळाली. सुम्बुलचे मोठे काका आले होते,ज्यांनी आपला खास अंदाज दाखवत बिग बॉसच्या टीआरपीला चारचॉंद लावले. त्यांचे विनोद ऐकून घरातील गंभीर वातावरण एकदम कॉमेडी शो मध्ये बदलून गेलं. (Simi Garewal In Bigg Boss 16 talk about finalist)

यानंतर सिमी ग्रेवाल यांनी घरात एन्ट्री केली. सिमी ग्रेवाल यांनी तब्बल १६ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलेलं पहायला मिळालं. त्या 'रेंडेवद विद सिमी ग्रेवाल' या शो ला होस्ट करण्यासाठील ओळखल्या जातात. सिमी ग्रेवाल यांच्या येण्यानं घराचं वातावरण पूर्ण बदलून गेलं. सिमी ग्रेवाल यांनी स्पर्धकांना खूपसारे प्रश्न विचारले. आणि बोलता बोलता त्यांनी टॉप ३ स्पर्धकांचा खुलासा केला.

सिमी ग्रेवाल यांनी पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. त्यांनी घरात प्रवेश करताच स्पर्धकांना विविध प्रश्न विचारुन बोलतं केलं. आणि खुलासा केला की त्या एमसी स्टॅनच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी स्टॅनच्या कामाची आणि त्याच्या स्वभावाची खूप प्रशंसा केली. एमसी स्टॅनच्या जीवनप्रवासानं आपण प्रेरित झाल्याचं देखील त्या म्हणाल्या..जे यश स्टॅननं मिळवलंय ते प्रशंसनीय आहे असं देखील विधान त्यांनी केलं.

यानंतर सिमी ग्रेवाल यांनी स्टॅनला विचारलं की, 'तू तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील?' तेव्हा त्यानं देवाला आणि आईला असं म्हटलं.आणि हे ऐकल्यावर त्याची प्रशंसा करताना सिमी ग्रेवाल थकल्या नाहीत.

पुढे सिमी ग्रेवालनी प्रियंका चाहर चौधरीला देखील काही प्रश्न केले. 'तिला स्टरडम आणि प्रेम यातनं कोणा एकाला निवडायचं असेल तर ती काय करेल' असा प्रश्न सिमी यांनी प्रियंकाला केला. तेव्हा प्रियंकानं, 'प्रेमाची निवड करेन' असं म्हटलं. आणि हाच प्रश्न शिवला विचारला तेव्हा त्यानं 'करिअर' असं उत्तर दिलं.

बिग बॉस शो ची प्रत्येक अपडेट देणाऱ्या एका साइटनं दिलेल्या बातमीतून समोर आलं आहे की, सिमी ग्रेवाल यांनी शो मध्ये टॉप ३ कोण असतील यांच्या नावांचा बोलता बोलता खुलासा केला आहे. सिमी यांनी जेव्हा बिग बॉस १६ च्या विजेत्यांविषयी बोलायला सुरुवात केली तेव्हा कॅमेरा प्रियंका,शिव आणि स्टॅनवर वळवला गेला. आणि यामुळेच आता टॉप ३ हे तिघे असतील या चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT