kishor kumar 
मनोरंजन

किशोर कुमार बर्थडे स्पेशल: मसूरची डाळ पाहुन किशोर दा यांनी केला होता मसूरीला जाण्याचा प्लान

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- प्रसिद्ध पार्श्वगायक, अभिनेते, लेखक, निर्माते, संगीतकार, पटकथालेखक एवढे सगळे गुण ज्या एकट्या व्यक्तीमध्ये होते ते म्हणजे किशोर कुमार. किशोर दा यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ मध्ये  मध्यप्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात झाला होता. किशोर कुमार यांचं खरं नाव आभास कुमार होतं. मात्र त्यांना त्यांच्या पडद्यावरील नावाने म्हणजेच किशोर कुमार यामुळेच ओळख मिळाली. किशोर दांच व्यक्तिमत्व प्रतिभावान होतं मात्र स्वभावाने ते मनमौजी आणि खोडकर होते. आज किशोर दा जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणी अनेकांसोबत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही मजेदार किस्से जाणून घेऊयात..

किशोर कुमार यांचा जादूई आवाज आजही अनेक संगीतप्रेमींना वेड लावतो. किशोर कुमार यांचा मोठा मुलगा अमित कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की किशो कुमार यांना इंग्रजी क्लासिक सिनेमे पाहण्याची आवड होती. एकदा तर त्यांनी अमेरिकेहून खूप सा-या वेस्टर्न सिनेमांच्या कॅसेट्स आणल्या होत्या. इतकंच नाही तर दर आठवड्याच्या शेवटी  अमित कुमार त्यांच्यासोबत एकानंतर एक तीन सिनेमाचे शो पाहुन थकुन घरी यायचे. 

अमितने पुढे सांगितलं की, किशोरजी स्वतः मनमौजीचं मानायचे. ते कधी काय करतील हे कोणालाच माहित नसायचं. एकदा जेव्हा सिनेमाचं शूटींग संपलं होतं तेव्हा युनिटमधील सगळे कर्मचारी पैसे मागायला आले होते. तेव्हा किशोरजी म्हणाले एवढे जास्त पैसै कसे झाले. एवढे नाही व्हायला पाहिजेत, हा दिग्दर्शक स्वतःला काय समजतो? असं नाही होऊ शकत. मी निर्माता आहे एवढा खर्च होत असेल तर या दिग्दर्शकाला पळवून लावा. कोण आहे दिग्दर्शक. तेव्हा सगळे म्हणाले तुम्हीच तर आहात. यावर किशोर दा म्हणाले 'अरे हा तो तर मीच आहे.'  

असाच एक मजेदार किस्सा सांगताना अमित म्हणाला की त्यांना बाजारात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या लहान-सहान गोष्टी खरेदी करण्याचा शौक होता. एकदा असेच ते बाजारात गेले. तिथे त्यांना मसूरची डाळ दिसल्यावर त्यांनी लगेचच मसूरीला फिरायला जाण्याचा प्लान बनवला होता.  किशोर कुमार हे स्वभावाने खूप चांगले होते पण तेवढेच खोडकर देखील होते असं त्यांच्यासोबत राहिलेल्या अनेकांनी मान्य केलं होतं.     

singer kishore kumar birthday know some interesting things about kishore da  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

SCROLL FOR NEXT