esakal
मनोरंजन

VIDEO: अखेरच्या क्षणात KK सोबत काय काय घडलं? समोर आली माहिती

प्रसिद्ध गायक केके याचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

धनश्री ओतारी

प्रसिद्ध गायक केके याचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. केके म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ याचा कोलकत्तामध्ये एक कॉन्सर्ट सुरू होता. कोलकत्तामध्ये आपल्या शोनंतर परतत असताना ग्रँड हॉटेल इथं केके (KK) हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळला. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अखेरच्या क्षणात केके सोबत काय काय घडलं याची माहिती समोर आली आहे.

कॉन्सर्ट दरम्यान केकेला गरमीचा खुप त्रास होत होता. तो व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये घाम पुसताना दिसत आहे. त्यानंतर तो एक व्यक्तीला इथे खुप गरम होत आहे. इथला एसीदेखील ठीक सुरु नाही. असं तो सांगताना दिसत आहे.

केकेने काल ७ वाजल्यापासून ९ पर्यंत कोलकातामधील गुरुदास कॉलेजमध्ये परफॉर्मस केला होता. यावेळी तो प्रचंड उत्साहात दिसला. परफॉर्मंस संपताच तो तात्काळ स्टेजवरुन बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी तो खुप अस्वस्थ दिसला. त्याच्या चेहऱ्यावर खुप घाम आल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रकृती खराब झाल्याचे लक्षात येताच तो थेट कारमधून हॉटेलमध्ये पोहचतो. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे डोकं दुखू लागते. त्यानंतर त्याला उपचारासाठी CMRI रुग्णलयात दाखल करण्यात आलं. रुग्णलय केवळ हॉटेलपासून केवळ ५ किलोमीटर लांब होते. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

केकेसोबत काम केलेले संगीत दिग्दर्शक जीत गांगुली ही बातमी समजताच पत्नीसह तात्काळ रुग्णालयात पोहोचले. आपला मित्र आता या जगात नाही यावर जीतचा विश्वासच बसत नव्हता. 'तो खूप तंदुरुस्त होता आणि नेहमी मला स्वतःची काळजी घेण्यास सांगत असे. तो माझा खूप चांगला मित्र होता. मला विश्वास बसत नाही की हे घडले आहे.' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : झोक्यावर खेळताना गळफास लागून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; कृष्णा बेशुद्ध झाला अन्...

आमदार काकांनी केला ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेची फसवणूक; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

Weekly Love Horoscope 27 October to 2 November 2025: बुध-मंगळ युतीमुळे मेष, कन्यासह 'या' राशींची लव्ह लाइफ असेल आनंदी

Train Ticket Booking Tips: ट्रेन तिकीट बुक करताय? मग आधी 'हे' एक काम करा,मिळेल कन्फर्म तिकिट

SCROLL FOR NEXT