mugdha vaishampayan FILE IMAGE
मनोरंजन

मुग्धा वैशंपायनचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं याडं!

गायिका मुग्धा वैशंपायनच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

प्रियांका कुलकर्णी

'सारेगमप- लिटिल चॅम्प्स'मधून घराघरात पोहोचणारी गायिका मुग्धा वैशंपायन तिच्या गाण्याने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करते. 12 वर्षांनंतर मुग्धा पुन्हा सारेगमपच्या नव्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या ती या शोमध्ये स्पर्धकाच्या नाही तर परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. नुकताच मुग्धाने एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (singer mugdha vaishampayan Swimming video viral on social media)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मुग्धा गावामधील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारताना दिसत आहे. तिच्या विहिरीमध्ये पोहण्याच्या स्टाईलची तुलना नेटकऱ्यांनी सैराटमधील आर्चीसोबत केली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर 'सैराट झालं जी' अशी कमेंट केली. मुग्धाने हा व्हिडीओ शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'आमची खानावची विहीर आणि त्यात उडी मारण्याचा आनंद'. या व्हिडीओला कमेंट करत मुग्धाच्या आनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केले आहे.

मुग्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. सारेगमप या शोच्या नव्या सिझनबद्दल पोस्ट करत मुग्धाने लिहीले होते, 'रसिकहो! 12 वर्षांपूर्वीच्या सारेगमप च्या पर्वामध्ये एक स्पर्धक म्हणून मी आले आणि माझा संगीत प्रवास सुरू झाला! एक स्पर्धक म्हणून तुम्ही मला प्रचंड प्रेम दिले आणि ते आजपर्यंत देत आहात. आज 12 वर्षांनी त्याच स्पर्धेत माझी परीक्षकाची (मार्गदर्शक ताईची) भूमिका असणार आहे .' काही दिवसांपूर्वी मुग्धाचे 'त्रिभुवनींचे सुख' हे गाणं प्रदर्शित झाले. या गाण्याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT