singer nick jonas concert crowd chanting jiju jiju nick reply video viral  SAKAL
मनोरंजन

Nick Jonas Video: कॉन्सर्टमध्ये 'जिजू जिजू' अशा घोषणा ऐकताच निक जोनासने दिली ही भन्नाट प्रतिक्रिया

निक जोनास सध्या त्याच्या कॉन्सर्टनिमित्ताने मुंबईत आहे

Devendra Jadhav

Lollapalooza India 2024 Nick Jonas: प्रियंका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास त्याचे भाऊ जो आणि केविन सोबत सध्या मुंबईत आहे. त्याने काल रात्री Lollapalooza मुंबई कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केला.

भारतीय चाहत्यांनीही या भावंडांचे जोरदार स्वागत केले. कॉन्सर्टमध्ये अनेकजण निक जोनासला 'भाऊजी' म्हणताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

भारताचा जिजू बनलेल्या निक जोनास आणि त्याच्या भाऊ कॉन्सर्टनिमित्त मुंबईत आहेत. जोनास बंधू गाणं गात असताना प्रेक्षकांनी जिजू जिजू म्हणून घोषणा दिल्या.

शनिवारी जोनास ब्रदर्स अर्थात निक, जो आणि केविन जोनास यांनी कॉन्सर्टच्या पहिल्या दिवशी त्यांच्या हिट गाण्यांवर सादरीकरण केले.

तर केविनने निकची प्रेक्षकांसमोर 'जीजू' म्हणून ओळख करून दिली. ज्यामुळे भारतीय चाहत्यांनी 'जीजू जीजू' असा जयघोष सुरू केला.

निकने त्याचा धाकटा भाऊ जो आणि मोठा भाऊ केविनची 'बिग पापा' म्हणून ओळख करून दिली. प्रियांका-निकची मुलगी मालती मेरी केविनला बडे पापा म्हणून हाक मारते.

निकने हे सांगताच केविनने "जीजू, लेडीज आणि जेंटलमन" अशी प्रतिक्रिया दिली. ज्यावर लोक हसायला लागले आणि मोठ्याने 'जिजू जीजू' म्हणू लागले. यावर निक म्हणाला, "मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो, धन्यवाद."

इतकंच नाही तो म्हणाला, "आमचा भारतातील हा पहिलाच परफॉर्मन्स आहे." जेव्हा जमावाने "जिजू, जिजू" चा नारा सुरू केला तेव्हा निक म्हणाला, "एक कुटुंब म्हणून माझे भारताशी खूप घट्ट नाते आहे. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासाठी ही रोमांचक रात्र असेल हे आमचे आश्वासन."

कॉन्सर्टनंतर जोनास ब्रदर्स नताशा पूनावालाच्या पार्टीमध्ये दिसले. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT