prathamesh laghate and mugdha vaishampayan ukhana video viral SAKAL
मनोरंजन

Prathamesh - Mugdha Wedding: असं झालं मुग्धाचं लघाटेंच्या घरी स्वागत, प्रथमेश उखाणा घेत म्हणाला, "मारक्या म्हशी..."

प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांनी गृहप्रवेशाच्या वेळी धम्माल उखाणा घेतलाय

Devendra Jadhav

Prathamesh Laghate - Mugdha Wedding: अगदी काहीच दिवसांपुर्वी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम गायक प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांनी एकमेकांशी लग्न केलं. प्रथमेश - मुग्धाचं पारंपरिक थाटात लग्न झालं.

लग्नानंतर मुग्धा लघाटेंची सुन झाली. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नानंतरच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत प्रथमेश - मुग्धाने एकमेकांसाठी धम्माल उखाणा घेतलेला दिसतोय.

प्रथमेश - मुग्धाचा गृहप्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश - मुग्धाने लग्नानंतरच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मुग्धाने प्रथमेश लघाटेच्या घरात गृहप्रवेश केला.

यावेळी प्रथमेशने मुग्धासाठी उखाणा घेतला. प्रथमेश उखाणा घेतला की, "कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी."

मुग्धाचा धम्माल उखाणा

"मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे माहेरची आणि सासरची खुण, प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना - उमेश लघाटेंची सून."

असा उखाणा मुग्धाने घेतलाय. या दोघांनी अगदी पारंपरिक थाटात गृहप्रवेश केलाय. यावेळी संपूर्ण लघाटे कुटुंब उपस्थित होतं.

प्रथमेश - मुग्धाचं थाटामाटात लग्न संपन्न

प्रथमेश - मुग्धाने एकमेकांसोबत २१ डिसेंबरला थाटामाटात लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार चिपळुणमध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. प्रथमेश चिपळूण, रत्नागिरीला राहणारा असून त्याच्या गावी हे लग्न झाल्याचं बोललं जात आहे.

प्रथमेशने लग्नाच्यावेळी लाल रंगाचा कुर्ता, खांद्यावर उपरणं तर डोक्यावर पगडी घातली होती. तर मुग्धाने पिवळ्या - हिरव्या रंगाची शेड असलेली साडी नेसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT