Shalmali Kholgade  
मनोरंजन

गायिका शाल्मली खोलगडेनं बांधली लग्नगाठ

मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत प्रियकर फरहान शेखशी केलं लग्न

स्वाती वेमूल

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेनं Shalmali Kholgade प्रियकर फरहान शेखशी Farhan Shaikh लग्नगाठ बांधली. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत या दोघांनी लग्न केलं. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं असून मित्रपरिवारासाठी ते १ डिसेंबर रोजी रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. फरहान आणि शाल्मली गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहान हा मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजीनिअर आहे.

शाल्मली आणि फरहान यांना लग्नाचा गाजावाजा नको होता, म्हणून त्यांनी घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली. शाल्मलीला नोंदणी पद्धतीनेच लग्न करायचं होतं. पण आईवडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घरी वैदिक पद्धतीने लग्न केलं. यावेळी फक्त १५ जण उपस्थित होते. घरच्या घरीच साध्या कपड्यांमध्ये दोघांनी लग्न केलं.

शाल्मलीने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये परेशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल), बलम पिचकारी (ये जवानी है दिवानी) या गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय इंडियन आयडॉल ज्युनिअर, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून सहभागी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT