मनोरंजन

Sonu Nigam : सोनू निगमला ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की? पोलिसांत तक्रार दाखल

सोनू निगमने या संदर्भात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. सोनू निगम याला ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलानी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला पुढे गेलेल्या अंगरक्षकांमधील दोन जण खाली पडल्याची माहिती आहे. या प्रकारात सोनू निगमला कोणतीही इजा झाली नसून त्यांच्यासोबतच्या टीममध्ये असलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे.

काल (सोमवारी) संध्याकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर येथे एका फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमचा या फेस्टिवलमध्ये लाईव्ह कार्यक्रम होता, दरम्यानच्या कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना सोनू सोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी IPC कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत का धक्काबुक्की केली? या धक्काबुक्कीचा मागचा उद्देश काय आहे? या संबधी अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काहीच स्पष्ट दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT