Vaishali Samant Google
मनोरंजन

गायिका वैशाली सामंतची लगीनघाई? वाचा सविस्तर

गायिका वैशाली सामंतनं नेहमीच तिच्या गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आता ती नेमकं नवीन काय घेऊन येतेय याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

प्रणाली मोरे

आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची(vaishali Samant) सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’(Kanyakumari) च्या लग्नासाठी(Wedding) आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.(SInger Vaishali Samant New Album,Kanyakumari)

‘कन्याकुमा री’च्या लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग या गाण्यातून छानपणे व्यक्त करण्यात आली आहे. मंदार चोळकर व मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे.

‘कन्याकुमारी’ गाण्याबद्दल बोलताना वैशाली सांगते की, ‘मी याआधीही लग्नाची बरीच गाणी गायली आहेत पण या गाण्याची खासियत म्हणजे नवरीच्या नखरेल अदा यातून खूप छान पद्धतीने आल्या आहेत. त्यामुळे हे गाणं गाताना तितकीच धमाल आली. हिंदी चित्रपटाला साजेसा भव्यपणा या गाण्यात पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही ‘कन्याकुमारी’ चे लग्न एन्जॉय करतील असं वैशाली सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT