Deepika Padukone Look In Singham Again Esakal
मनोरंजन

Singham Again: आली रे आली, लेडी सिंघम आली! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दीपिकाचा शक्ती अवतार..

Vaishali Patil

Deepika Padukone Look In Singham Again: रोहित शेट्टी त्याच्या आगामी सिनेमा सिंघम अगेनमुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. सिंघम या चित्रपटाची एक वेगळी तगडी फॅन फॉलोइंग आहे.

अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार मुख्य भूमिका असलेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटातील लेडी सिंघमचा लूक आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सिंघम अगेन' मध्ये दीपिका पादूकोणची एंट्री झाली आहे.

रोहित शेट्टीने सोशल मीडियावर लेडी सिंघमच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पदुकोणचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. दीपिका यात चंडी अवतारात दिसत आहे. दिपीकाला लेडी सिंघमच्या स्टाईलमध्ये पाहिल्यानंतर आता हा सिनेमा किती खतरनाक असेल याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

नवरात्रीलाच्या खास मुहूर्तावर दिपीकाने चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव शक्ती शेट्टी आहे. दिपीकापदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिपीकाने पोलिसांचा गणवेश परिधान केलेला आहे.

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण तिच्या बंदुकीसह हसताना दिसत आहे. या क्लोज-अप फोटोत दीपिकाच्या हाताला जखमा झालेल्या आणि कपाळातून रक्त वाहताना दिसत आहे. त्यामुळे हा अॅक्शन सीन्स किती कमालीचा असणार याची चर्चा सुरु आहे.

ही पोस्ट शेअर करताना रोहित शेट्टीने लिहिले की, 'स्त्री हे सीतेचे आणि दुर्गेचेही रूप आहे... भेटा आपल्या कॉप युनिव्हर्सच्या सर्वात क्रूर आणि हिंसक अधिकाऱ्याला... शक्ती शेट्टी... मेरी लेडी सिंघम... दीपिका पदुकोण. .'

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि श्वेता तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपुर्वी करिनाने देखील या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.


चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT