singham again ranveer singh first look as simmba ajay devgn deepika padukon SAKAL
मनोरंजन

Singham Again Ranveer Singh: बजरंगबली की जय! 'सिंघम अगेन' मधील रणवीरच्या 'सिंबा'चा पहिला लुक समोर

सिंघम अगेन मधील रणवीर सिंगचा पहिला लुक समोर आलाय

Devendra Jadhav

Sigham Again Ranveer Singh Simmba Look News: गेल्या काही दिवसांपासुन रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काही दिवसांपासुन रोहीत शेट्टी सिंघम अगेन मधील अभिनेत्यांचे लुक शेअर करतोय.

अशातच रोहीत शेट्टीने आज सिंघम अगेन मधील रणवीर सिंगचा पहिला लुक समोर आणलाय. रणवीर सिंघम अगेन निमित्ताने पुन्हा एकदा सिंबाच्या भुमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

(singham again ranveer singh first look as simmba ajay devgn deepika padukon)

रणवीर सिंग पुन्हा एकदा सिंबाच्या भुमिकेत

सबसे नटखट सबसे निराला आला रे आला सिंबा आला, असं कॅप्शन देत रणवीरचा खास लुक शेअर करण्यात आलाय. पोस्टरमध्ये दिसतं की रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच एनर्जीत सिंबाच्या भुमिकेत सज्ज झालाय.

या पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे पोलिस व्हॅन आणि बजरंगबलीची मुर्ती दिसतेय. अशाप्रकारे रणवीर सिंग सिंघम अगेन पुन्हा एकदा धम्माल करणार यात शंका नाही.

रणवीर - दीपिका पुन्हा एकत्र

सिंघम अगेन मध्ये रणवीर - दीपिका पुन्हा एकत्र दिसणार आहेत. रोहित शेट्टीने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर लेडी सिंघमच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पादुकोणचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे.

दीपिका यात चंडी अवतारात दिसत आहे. त्यामुळे सिंघम अगेन निमित्ताने रणवीर - दीपिका पुन्हा एकत्र पाहायला मिळणार यात शंका नाही.

या दिवशी येणार सिंघम अगेन भेटीला

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि श्वेता तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपुर्वी करिनाने देखील या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT