single father karan johar and tusshar kapoor celebrate fathers day sakal
मनोरंजन

Father's day : बापासोबत आई होणं जरा अवघडच, सिंगल फादर करण आणि तुषारची..

करण जोहर आणि तुषार कपूर हे लग्न न करताच झाले आहेत बाप, आता मुलांसाठी तेच आहेत आई आणि वडील.

नीलेश अडसूळ

बाबांचं महत्व खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचं असतं. पण 'फादर्स डे' च्या निमित्तानं याच वडिलांविषयी काही तरी खास बोलण्याची संधी सगळ्यांना सापडते. आजच्या दिवशी अनेक सेलिब्रिटी वडिलांचं कौतुक करत,पोस्ट टाकत व्यक्त झाले आहेत. पण दोन असे सेलेब्रिटी आहेत ज्यांनी स्वतःलाच फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कारण ते वडील आणि आई दोघांच्या भूमिकेत आहेत. जाणून घेऊया दिग्दर्शक करण जोहर (karan johar) आणि अभिनेता तुषार कपूर (tusshar kapoor) यांच्या 'बाप' पणाविषयी.. (single father karan johar and tusshar kapoor celebrate fathers day nsa95)

आयुष्यात वडिलांची जितकी गरज असते तितकीच आईचीही असते. पण कधीतरी काळाने किंवा आपल्या मर्जीने या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीला पार पाडाव्या लागतात. असाच निर्णय बॉलीवूड मधील दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता तुषार कपूर यांनी घेतला. ते दोघेही सिंगल फादर आहेत. म्हणजे त्यांच्या मुलांना आई नाही. त्यांनी लग्न न करता सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे आई आणि बाप या दोन्ही भूमिका ते पार पाडत आहेत.

एका मुलाला दत्तक घेऊन किंवा सरोगसी तंत्राचा आधार घेऊन ‘सिंगल फादर’ बनण्याची इच्छा करण जोहरनं आपल्या आत्मचरित्रात - 'अॅन अनसुटेबल बॉय' मध्ये व्यक्त केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांना जन्म दिला. 'यश' आणि 'रूही' अशी त्याच्या मुलांची नावे आहेत. तर तुषार कपूरही सरोगासीच्या माध्यमातून बाप बनला आहे. बाप आणि आई या दोन्ही भूमिका पार पडताना होणारी कसरत याविषयी तुषार अनेकदा खुलेपणाने बोलला आहे. तुषार आणि करण आपल्या मुलांचा अत्यंत जिव्हाळ्याने सांभाळ करत असून आजचा फादर्स डे त्यांच्यासाठी विशेष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

SCROLL FOR NEXT