SK Bhagavan Passes Away Esakal
मनोरंजन

SK Bhagavan Passes Away: साउथ इंडस्ट्रीला लागली नजर! पुन्हा एका दिग्दर्शकाच्या निधनामुळं मोठा धक्का..

सकाळ डिजिटल टीम

साउथ सिने इंडस्ट्रीतुन पुन्हा एक दु:खद बातमी समोर आली आहे. कन्नड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांच निधन झालं आहे. त्यांनी आज बेंगळुरू वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून वृद्धापकाळ आणि त्या संबंधित आजारांशी झुंझ देत होते. त्याच्या जाण्याने पुन्हा साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही त्यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी शोक व्यक्त केला आहे. एसके भगवान यांच्या निधनाबद्दल त्यांनी ट्विट करत शोक व्यक्त करत त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचे स्मरण आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करतो.

एस.के.भगवान यांनी रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1956 मध्ये त्यांनी कनागल प्रभाकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. दोराई आणि भगवान जोडी ही कन्नड चित्रपटातील चित्रपट निर्मात्यांची पहिली आणि प्रसिद्ध जोडी होती. या जोडीने दिग्दर्शित केलेल्या बाँड शैलीतील चित्रपटांमध्ये 'जीवन चैत्र', 'गोवा दल्ली सीआयडी 999', 'ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सैदी 999' आणि ऑपरेशन डायमंड रॅक यांचा समावेश आहे.

एसके भगवान यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. एका मागून एक होणाऱ्या मृत्यूमुळे सर्वच दु:खी आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या जगाचा निरोप घेणार्‍या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींमध्ये के विश्वनाथ, वाणी जयराम, टीपी गजेंद्रन, तारक रत्न आणि मयिलसामी यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT