Dan Bilzerian news  esakal
मनोरंजन

Dan Bilzerian: शौकीन डॅननं बांधल्या मुंडावळ्या! कोणाशी केलं गुपचूप लग्न?

सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी म्हणून डॅन बिलझेरीनची ओळख आहे.

युगंधर ताजणे

Social media influencer 'Dan Bilzerian: सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी म्हणून डॅन बिलझेरीनची ओळख आहे. सारं जग त्याला सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर म्हणून ओळखतं. त्याचा एक फोटो (viral news) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असून त्यांनी लग्न केल्याचे दिसत आहे. त्यामुळे डॅनचे चाहते कोड्यात पडले आहेत की, डॅननं लग्न तर केले नाही ना, गेल्या काही (entertainment trending news) दिवसांपासून डॅनच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. तो कुणाशी लग्न करणार, त्याची होणारी पत्नी कोण आहे, याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत्या.

आपल्या ऐशोआरामासाठी फेमस असणाऱ्या डॅनला देखील लग्नाच्या मुंडावळ्या बांधाव्या लागल्यानं त्याच्या चाहत्यांनी त्याला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. डॅनची ओळख ही त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी आहे. त्यानं इंस्टावर एक फोटो शेयर केला आहे. त्यात तो वराच्या वेषात वधुसोबत उभा आहे. त्याच्या चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, तो आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यानं तो फोटो शेयर करताना एक कमेंट देखील दिली आहे. त्यात तो म्हणतो, अखेर मी करुन दाखवलं.

डॅनच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटसचा वर्षाव सुरु केला आहे. अवघ्या काही तासांत त्याला हजारो कमेंटस आल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, खरं सांग तू लग्न केलं की काय, दुसऱ्यानं म्हटलं आहे, असं गुपचूप लग्न करतात का, आम्हाला लग्नाला बोलावलं नाही, असंही एका युझर्सनं म्हटलं आहे. डॅनच्या त्या पोस्टवर प्रतिक्रियांचा ओघ सुरु झाला आहे. आज माझ्या सर्वात मोठ्या स्पर्धकाचं लग्न झाले आहे. त्यामुळे तो आता संपला आहे अशी गंमतीदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

डॅनियल ब्रॅडन बिल्जेरियन हा एक अमेरिकन पोकर आहे. त्याला सारेजण सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर म्हणूनही ओळखलं जातं. 40 वर्षीय डॅन हा त्याच्या हटक्या लाईफस्टाईलसाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. जगातील सर्वात श्रीमंत जुगारी म्हणूनही त्याला ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

SCROLL FOR NEXT