sohail khan 
मनोरंजन

"मदत लागल्यास थेट मला फोन कर"; राखी सावंतसाठी सोहैल खान सरसावला पुढे

स्वाती वेमूल

अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत कर्करोगाशी झुंज देत असून अनेक सेलिब्रिटी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. एकीकडे बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने राखीची मदत केली असून आता दुसरीकडे सोहैल खाननेही तिला आधार दिला आहे. कोणतीही मदत लागल्यास थेट मला कॉल कर, असं सोहैलने राखीला म्हटलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये सोहैल म्हणतोय, "माय डिअर राखी, तुला किंवा तुझ्या आईला कोणतीही मदत लागल्यास थेट मला कॉल कर. मी तुझ्या आईला कधी भेटलो नाहीये, पण मी तुला खूप जवळून ओळखतो. तू इतकी खंबीर आहेस आणि तुझी आईसुद्धा तुझ्यापेक्षा जास्त खंबीर असेल. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. मी लवकरच तुझी व तुझ्या आईची भेट घेईन. काळजी घे."

'बिग बॉस'च्या चौदाव्या सिझनमध्ये राखी अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र जेव्हा तिला १४ लाख रुपये घेऊन घर सोडण्याची ऑफर देण्यात आली, तेव्हा तिने मागचा पुढचा विचार न करता, पैशांची बॅग घेतली आणि बिग बॉसचं घर सोडलं. आईच्या उपचारासाठी हे पैसे खूप गरजेचे असल्याचं तिने सांगितलं. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईचे काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. जया सावंत यांची किमोथेरेपी सुरू असून त्यांनी सलमान व सोहैल खान यांचे आभार मानतानाचा एक व्हिडीओ राखीने पोस्ट केला होता. 

आईच्या उपचारासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करतेय, तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, असं तिने बिग बॉसच्या घरातून निघताना म्हटलं होतं. आई आणि स्वत:चीही काळजी घे, असं म्हणत नेटकऱ्यांनी व सेलिब्रिटींनीही तिला आधार दिला आहे. कश्मीरा शाह आणि संभावना सेठ या सेलिब्रिटींनी राखीच्या आईची रुग्णालयात भेट घेतली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT