Seema Sajdeh news  esakal
मनोरंजन

Seema Sajdeh: 'सोहेल हा...' 24 वर्षानी घटस्फोटाचं धक्कादायक कारण समोर

आता सध्या सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव (Seema Sajdeh) यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Fabulous Lives of Bollywood Wives: बॉलीवूडमध्ये फेमस सेलिब्रेटींच्या घटस्फोटाची चर्चा ही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. आता सध्या सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव (Seema Sajdeh) यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. काल सीमाच्या मुलानं आडनाव बदलल्यामुळे आई सीमावर नाराजी व्यक्त केली होती. आपलं आडनाव हे खानच आहे. असे त्यानं ठणकावून सांगितले होते. यासगळ्यात सीमानं 24 वर्षानंतर आपल्याला सोहेलशी घटस्फोट घ्यावा लागला यामागील कारण सांगितले आहे.

फॅब्युलस लाव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्स या वेब मालिकेनं सेलिब्रेटींच्या पत्नीच्या दिनक्रमाविषयी सांगण्यात आले होते. त्या काय करतात, त्यांच्या किटी पार्टीज, त्यांच्याभोवती फिरणारे वाद, भांडणं आणि कौटूंबिक नातं याविषयी त्या मालिकेमध्ये भाष्य करण्यात आले होते. करण जोहर निर्मित या मालिकेचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यातून वेगळे वाद समोर आले आहेत. मी आणि सोहेल गेल्या पाच वर्षांपासून वेगळे राहत आहोत. आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारण आता सीमानं सांगितलं आहे.

सीमा ही तिच्या नव्या वेब मालिकेमुळे चर्चेत आली आहे. त्या बॉलीवूड वाईव्हजमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. सध्या सीमा आणि सोहेल खानच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. शो ची सुरुवात सीमाच्या घरापासून होते. त्यात ती आपल्या घराची नेमप्लेट दुरुस्त करते. खान बदलून तिनं आपलं नाव सीमा, निर्वाण आणि योहान असे केले आहे. त्यावरुन तिचं आणि सोहेल खानचं काही बिनसलं आहे हे तर दिसून आलं आहे. मालिकेतल्या एका एपिसोडमध्ये सीमानं सांगितलं की, आमच्यात सगळा गोंधळ होता. मग तो अनेक बाबतीतील सांगता येईल, संवादाचा अभाव होता.

सोहेल हा त्याच्या मनाप्रमाणे जगणारा व्यक्ती आहे. आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला काय हवे, तिच्या मानसिकतेचा विचार करणारा नाही. असे मला त्याच्यासोबत राहताना जाणवले. आम्ही आमच्यातील अनेक प्रॉब्लेम्स हे संवादानं सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शेवटपर्यत काही सुटला नाही. वाद वाढत गेला. त्याचा परिणाम मुलांवर होत होता. नात्यावरही झाला. शेवटी आम्ही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

1998 मध्ये सोहेल आणि सीमाचं लग्न झालं होतं 2000 मध्ये त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव निर्वाण. त्यानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून योहानला जन्म दिला. 24 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानं फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT