Sonakshi Sinha esakal
मनोरंजन

Sonakshi Sinha : 'एवढ्या मोठ्या अभिनेत्याची मुलगी पण अभिनयाच्या नावानं बोंब'! सोनाक्षीवर कुणी साधला निशाणा?

बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनाक्षीचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असलेल्या सोनाक्षीच्या चित्रपटांना मोठा चाहतावर्ग मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Kamya Panjabi took a dig on Sonakshi sinha acting in dahaad : बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनाक्षीचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असलेल्या सोनाक्षीच्या चित्रपटांना मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. सोनाक्षी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात काही कलाकारांना सोनाक्षीला अजून अॅक्टिंग येत नाही. असे वाटते. Kamya Panjabi took a dig on Sonakshi sinha acting in dahaad

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एका अभिनेत्रीनं सोनाक्षीवर निशाणा साधला आहे. तिचे म्हणणे आहे की सोनाक्षी ही बॉलीवूडमधील एका दिग्गज अभिनेत्याची मुलगी आहे. मात्र अभिनयाच्या बाबत तिच्याविषयी शंका आहे. तिला चांगली अभिनेत्री म्हणायचे की नाही, याबाबत प्रश्न आहे. त्या अभिनेत्रीच्या अशा प्रकारच्या टीकेनं एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. सोनाक्षीचे चाहतेही संतापले आहेत.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यापूर्वी देखील तिनं ज्याप्रकारची वक्तव्ये केली आहे त्यामुळे ती ट्रोल झाली होती. आता काम्यानं थेट बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षीवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीची दहाड नावाची वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.

अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. ह्युमन ट्रॅफिकिंग सारख्या विषयावर आधारलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. त्यातील विजय आणि सोनाक्षीच्या भूमिकेनं या मालिकेची उंची आणखी वाढली होती. सोनाक्षीचा सोशल मीडियावर बोलबाला होत असताना काम्याच्या प्रतिक्रियेनं मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खरं तर काम्यानं सोनाक्षीचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे तिच्यावर टीका केली आहे. मात्र चाणाक्ष नेटकऱ्यांना काम्याचा रोख कुणाकडे आहे हे कळायला वेळ लागला नाही. तिनं म्हटलं आहे की, काही कलाकार असे आहेत की त्यांनी कसाही अभिनय केला तरी तो आपल्या चांगला वाटत नाही. एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलीनं ओटीटीवर डेब्यु केलं आहे. मात्र तिचा अभिनय पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले.

मी फक्त त्या मालिकेचा एकच एपिसोड पाहिला. त्यानंतर ती पूर्ण मालिका पाहण्याचे माझे धाडस झाले नाही. याला कारण त्यातील कलाकारांचा अभिनय. अशी प्रतिक्रिया काम्यानं दिली आहे. दरम्यान सोनाक्षीच्या चाहत्यांनी काम्यावर परखड शब्दांत टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT