Zaheer Iqbal Wishes Sonakshi Sinha  Esakal
मनोरंजन

Sonakshi- Zaheer Iqbal : 'कुछ तो लोग कहेंगे', लोकांना टोमणे मारत सोनाक्षीच्या बॉयफ्रेंडनं केल तिला बर्थडे विश! पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या डेब्यू वेब सीरिज दहाडमुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी, तिला तिच्या चाहत्यांसोबतच अने कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र यावेळी एका विषेश व्यक्तीच्या बर्थडे विशमुळे ती चर्तेत आली.

सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. जरी या जोडप्याने कधीही त्यांच्या रिलेशनशिपला कन्फर्म नव्हतं मात्र आता हे कन्फर्म झालं आहे.

झहीर इक्बालने सोनाक्षीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. इतकेच नाही तर यावेळी झहीरने आपलं प्रेम खुलेपणाने व्यक्त देखील केलं आहे.

झहीर इक्बालने त्याचे आणि सोनाक्षीचे काही फोटो शेयर केले आहेत या फोटोंसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कुछ तो लोगो कहेंगे, लोगो का काम है कहना…. तू नेहमीच माझा आधार घेऊ शकते. तु सर्वोत्तम आहेस. गर्जत रहा आणि नेहमी उडत रहा. तू संपूर्ण जग बघ जसं कोणीही नसेल पाहिलं, नेहमी जलपरीसारखं जगा. नेहमी आनंदी रहा. आई लव यू" त्याने 'परफेक्ट' हॅशटॅगसह त्याच्या नोटचा शेवट केला.

आता ही पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाली असून या पोस्टमध्ये झहीरने खुलेपणाने त्याच प्रेम व्यक्त केलं आहे.

तर सोनाक्षीने देखील या पोस्टला कमेंट केली आहे. आता ही पोस्ट समोर आल्यानंतर, सोनाक्षी आणि झहीरच्या नात्याची ही अधिकृत घोषणा असल्याचे चाहते गृहीत धरत आहेत.

झहीर इक्बाल बद्दल सांगायचं झालं तर त्याने नोटबुक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. सलमान खानच्या पार्टीत तो पहिल्यांदा सोनाक्षी सिन्हाला भेटला होता. यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि मग दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.

यानंतर दोघांनी डबल एक्सएल चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर सलमानच्या बहिनीने दोघांना उद्देशून एक पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर त्याच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT