Sonalee Kulkarni Birthday stroy her love story first love break up know about who is he sakal
मनोरंजन

Sonalee Kulkarni Birthday: 5 वर्षांचं प्रेम आणि तडकाफडकी ब्रेकअप.. कोण होतं सोनालीचं पहिलं प्रेम?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. गेली काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे. मग तिचे लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते.

मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती 'महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा अनेक फोटो, व्हिडिओ शेयर करत असते.

अशा सोनालीचा आज वाढदिवस,आज ती आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच माहीत आहे. पण आज तिच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घेऊया..

(Sonalee Kulkarni Birthday stroy her love stroy first love break up know about who is he)

सोनाली कुलकर्णी आणि तीचं लग्न हा गेल्यावर्षी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. तिच्या लग्नाचा व्हिडिओ, परदेशी रंगलेला विवाहसोहळा अशी जय्यत तयारी सोनालीने केली होती. हे तिचे दुसरे लग्न होते.

म्हणजे सोनालीने पती कुणाल सोबतच दोन वेळा लग्न केले. त्यांनी करोनाकाळात ते दुबई मध्ये अडकले होते त्यामुळे त्यांनी अत्यंत साधेपणाने तीचेच लग्न केले. परंतु लग्नाची हौस झाल्याशिवाय लग्न करण्याची मजा नाही असं सोनालीचं म्हणणं पडलं म्हणून तिने पुन्हा लंडन मध्ये जाऊन कुणाल सोबत लग्नगाठ बांधली. हा सोहळा अत्यंत दिमाखदार असा होता.

यावेळी सोनाली आणि कुणाल यांचं कसं जमलं यावर बरीच चर्चा झाली. त्यांची लव्हस्टोरी सांगितली गेली. पण सोनालीचं एक प्रेम असं आहे जे आजवर कुणालाच माहीत नाही.

सोनाली कॉलेज लाईफ मध्ये एका मुलाच्या आकंठ प्रेमात बुडाली होती. तो तिला प्रचंड आवडायचा. हा सोनालीचा सीनियर होता. विशेष म्हणजे सोनालीनेच त्याला प्रपोज केले. त्यांचे प्रेमही जुळले.

जवळपास पाच वर्षे ते एकत्र होते. परंतु पाच वर्षांच्या रिलेशन नंतर त्या दोघांनीही सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीच्या नावाबद्दल सोनालीने कायमच मौन बाळगले आहे. त्यानंतर सोनाली बराच काळ सिंगल होती. आणि मग तिच्या जवळच्या मित्रांच्या ग्रुप मधल्याच एकाशी म्हणजे कुणाल बेनोडेकरशी तिचे सूत जुळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT