sonalee kulkarni emotional post after nitin desai and n d mahanor passed away work in ajintha marathi movie  SAKAL
मनोरंजन

माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला.. सोनाली कुलकर्णीची जीवाला चटका लावणारी पोस्ट

नितीन देसाई आणि ना. धों. महानोर यांच्यासोबत सोनालीने अजिंठा सिनेमात काम केलंय

Devendra Jadhav

मनोरंजन विश्वाला गेल्या दोन दिवसात फार मोठा धक्का बसला. काल बुधवारी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचं निधन झालं. तर आज निसर्गकवी म्हणुन ओळख असलेले ना. धों. महानोर यांचं निधन झालं.

मराठी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार नितीन देसाई आणि ना. धों. महानोर यांच्याबद्दल भावुक पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट लिहीली आहे. सोनालीला या दोन दिग्गजांसोबत अजिंठा सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

(sonalee kulkarni emotional post after nitin desai and n d mahanor passed away work in ajintha marathi movie)

सोनाली कुलकर्णीने अजिंठा सिनेमाच्या सेटवरील फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन सोनाली लिहीते.. कालच्या धक्क्यातून अजून सावरता आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली…नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!

सोनाली पुढे लिहीते.. "माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना.धों. महानोर आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर राहतील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की

नितीन देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच…"

सोनाली शेवटी लिहीते, "पद्मश्री ना.धों. महानोर  यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं

रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Mega Block : मुंबईप्रमाणे पुण्यातही मेगाब्लॉक! अमरावती-पुणेसह जवळपास ११ गाड्या रद्द, तर 'या' गाड्यांचे मार्ग बदलले

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

SCROLL FOR NEXT