sonalee kulkarni  google
मनोरंजन

या अभिनेत्रीनेही केले लोकलमधील फोटो शेअर..

मनोरंजन विश्वातील कलाकार क्वचितच सामन्यांच्या गर्दीत दिसत असतात. नुकताच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या लोकलप्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या अभिनेत्रीच्या लोकल प्रवासाची चर्चा आहे.

नीलेश अडसूळ

sonalee kulkarni : मनोरंजनविश्वातील कलाकार सहसा जनमानसात येत नाहीत. चित्रीकरण, इव्हेन्ट यामध्ये कायम वैयक्तिक वाहनाचाच ते वापर करतात. पण कधीतरी काही प्रसंगांमुळे किंवा सहजच अनुभव म्हणून काही कलाकार सार्वजनिक वाहनाने प्रवास करत आहेत. या प्रवासात आलेले अनुभव आणि त्याचे फोटोही कलाकार आवर्जून शेअर करतात.

नुकताच अभिनेता (nawazuddin siddhiqui) चित्रीकरणाहून इव्हेन्टला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास करताना दिसला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच या अभिनेत्रीच्या लोकल प्रवासाची चर्चा आहे. 'झिम्मा' या चित्रपटातून नुकतीच आपल्या भेटीला येऊन गेलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने लोकल प्रवास केला आहे. मुंबईच्या लोकलने प्रवास करताना घेतलेला आनंद तिने फोटोद्वारे शेअर केला आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी तिच्यासोबत एक खास व्यक्ती दिसून आली आहे.

साधारण दोन दिवसांपूर्वीचे हे फोटो असल्याची माहिती मिळाली असून सोनाली तिच्या आईसोबत लोकलमध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. याला “सावी कुलकर्णीसोबत अनेक वर्षानंतर मुंबई लोकलचा प्रवास” असे कॅप्शन सोनालीने दिले आहे. सध्या तिच्या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.

sonalee kulkarni

या फोटोनुसार सोनाली महिला आरक्षित डब्ब्यातून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. तर तिने एक साधा कुर्ता आणि मास्क परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेनेही मुंबई लोकलने प्रवास केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने देखील मुंबईत रिक्षाने प्रवास केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT