Sonalee Kulkarni Tanishq Advertisement shares on Insta  
मनोरंजन

सोनाली कुलकर्णीचं लग्न झालं? इन्स्टावर शेअर केला फोटो

वृत्तसंस्था

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या लग्नांना उधाण आलंय. अनेक कलाकार कोणालाही न सांगता थेट लग्न करूनच सोशल मीडियावर फोटो, पोस्ट शेअर करतात आणि धक्का देतात. अशाच प्रकारे सर्वांची लाडकी अप्सरा हिनेही तिचा साडीतला एक फोटो शेअर करून सर्वांना धक्का दिला आहे. या फोटोत ती नवविवाहीतेसारखी  दिसत आहे. त्यात भर म्हणजे, तिने मंगळसूत्र घातलंय आणि तेही उलटं!

सोनाली कुलकर्णीच्या लव्हलाईव्हबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच तिने तिच्या फोटोवर आलेल्या चाहतीच्या कमेंटवर असं काही उत्तर दिलंय की तिचं लग्न झालं असावं... सोनालीने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केलाय. गुलाबी रंगाच्या भरजरी साडीत ती खूप सुंदर दिसतीय. नवविवाहितेसारखी सजलेली सोनाली तिच्या लूकमुळे आणि त्यातही उलट्या घातलेल्या मंगळसूत्रामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोवर तिच्या चाहतीने 'अगं ताई तुझे मंगळसूत्र उलटे झाले आहे...' अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर उत्तर देत सोनाली म्हणते, 'लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात.' तिच्या या कमेंटमुळे सोनालीच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आले आहे. तिनं मंगळसूत्र उलटं का घातलंय, तिचं लग्न झालंय का अशा अनेक प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं आहे. 

पण नुकतीच तिने एक जाहीरातीचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला. तिने हा लूक एका जाहीरातीसाठी केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. तनिष्क ज्वेलरीचा हा व्हिडिओ असून मंगळसूत्र महोत्सव विशेष आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

SCROLL FOR NEXT