Sonalee kulkarni mangalsutra 1 
मनोरंजन

सोनाली कुलकर्णीच्या मंगळसूत्राची फॅशन; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'सौभाग्य लेण्यांचा' हा मॉडर्न ट्रेंड सध्या बाजारात हिट आहे.

स्वाती वेमूल

सौभाग्यलंकार मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राची 'फॅशन' नवनवीन रुपानं महिलांपुढे येत आहे. हल्ली मंगळसूत्राचं ब्रेसलेट आणि अँकलेटसुद्धा ट्रेंडमध्ये आहेत. त्यातही बॉलिवूड किंवा मराठी सेलिब्रिटींनी घातलेल्या मंगळसूत्रांच्या डिझाइनची चर्चा फॅशनप्रेमींमध्ये चांगलीच रंगते. मराठी मालिका किंवा चित्रपटांमधल्या नायिकांचं मंगळसूत्र हा बाजारपेठेतला ट्रेंड ठरतो. 'सौभाग्य लेण्यांचा' हा मॉडर्न ट्रेंड सध्या बाजारात हिट आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni सध्या पती कुणाल बेनोडेकरसोबत Kunal Benodekar मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद लुटतेय. मालदीवच्या निसर्गरम्य ठिकाणावरील काही फोटो सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एकीकडे या फोटोंमधील सोनालीच्या कपड्यांच्या फॅशनची चर्चा तर होतच आहे, पण दुसरीकडे सोनालीच्या गळ्यातील ट्रेंडी मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

साडी किंवा पंजाबी ड्रेसवरच मंगळसूत्र शोभून दिसतं, असं अनेकांचं मत असतं. किंवा मॉडर्न, स्टायलिश कपडे घातल्यावर त्याला शोभून दिसणारे मॉडर्न डिझाइनचेच मंगळसूत्र वापरण्यावर स्त्रियांचा भर असतो. काही स्त्रिया अशा वेळी गळ्यात मंगळसूत्र घालणं टाळतात. पण सोनालीने तिच्या कपड्यांच्या फॅशननुसार विविध मंगळसूत्रांची निवड केली आहे.

सोनालीने लाल रंगाच्या कपड्यांवर सिल्वर चेन मंगळसूत्र तर काळ्या रंगाच्या कपड्यांवर सिल्वर पर्ल मंगळसूत्र परिधान केले आहे. मालदीवहून इन्स्टा लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना अनेक नेटकऱ्यांचं लक्ष सोनालीच्या मंगळसूत्राने वेधलं होतं. "मला साध्या आणि तितक्याच ट्रेंडी डिझाइनचं मंगळसूत्र हवं होतं. म्हणून मी आद्या या ब्रँडकडून या मंगळसूत्राची निवड केली", असं तिने यावेळी चाहत्यांना सांगितलं.

सोनालीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली. कुणालच्या वाढदिवसानिमित्त सध्या हे दोघं मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत प्रभाग 59 मध्ये एकूण 24896 मतदान, 11 उमेदवार मैदानात... कोण जिंकणार?

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात मतमोजणीला सुरूवात, सजेत पाटील, धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला

Gold Rate Today : राज्यात महापालिका निकालाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; खरेदी करण्याआधी पाहा आजचे भाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांसह शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT