Sonali Bendre  Team esakal
मनोरंजन

'कॅन्सरला घाबरले नाही, त्याला सामोरी गेले अन् लढाई जिंकली'

सोनालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे....

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Bollywood actress sonali bendre) हिला कॅन्सर (cancer) झाला होता. आता ती त्यातून बरी झाली आहे. तिनं मोठ्या जिद्दीनं कॅन्सरला सामोरं जात त्यावर मात केली होती. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणून सोनालीचे नाव घेता येईल. ज्यावेळी तिला कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली होती तेव्हा तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. (sonali bendre shares before and after picture of recovery says she wont be defined)

नुकताच कॅन्सर सर्वाव्हर्स डे (cancer survivers day) साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं सोनालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोनालीनं यशस्वीपणे कॅन्सरवर मात केली आहे. तिनं मोठ्या प्रयत्नानं कॅन्सरला टक्कर दिली आहे. त्यामुळे तिचा तो प्रवास कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेरणादायी म्हणावा लागेल. सोनालीनं आपल्या पोस्टमध्ये तिचा कॅन्सरच्या दरम्यान उपचार घेतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये प्रसिध्द अभिनेत्री किरण खेर (kirron kher) या देखील कॅन्सरनं त्रस्त आहेत. त्यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याविषयी माहिती दिली होती. त्यांचे पती आणि प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी किरण खेर यांच्यासाठी चाहत्यांना आवाहन केले होते.

सोनालीनं यावेळी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे, वेळ किती लवकर जातो हे काही कळत नाही. आता मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा कळते की, आपण किती मोठा आणि खडतर प्रवास केला आहे. जेव्हा कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा ती परिस्थिती मला वेदनादायी वाटली होती. मात्र मी खंबीर राहिले. कॅन्सर हा शब्द मी आव्हान म्हणून स्वीकारला आणि त्यातून बाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT