Sonalee Kulkarni emotional post for her grandmother,share navratrotsav memories  Instagram
मनोरंजन

'आज ती नसली तरी...'; नवरात्रीला सोनालीच्या भावूक पोस्टनं वेधलं लक्ष

सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर आजीसोबतचा़ फोटो शेअर करत नवरात्रोत्सवाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Sonalee Kulkarni: आज घटस्ठापना..नवरात्रोत्सवाला सुरुवात...आनंदाचा,उत्साहाचा,उत्सवाचा पहिला दिवस. घरोघरी घटाची पूजा केली जाते. माळा लावल्या जातात. देवीची आराधना केली जाते. जागर केला जातो. वातावरण कसं प्रफुल्लित असतं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या उत्सवात रंगून गेलेले दिसतात. आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले उत्सवाचे काही अनुभवही शेअर केलेत. यादरम्यान अप्सरा सोनाली कुलकर्णीनं देखील नवरात्रीच्या शुभेच्छा देत एक भावूक आठवण शेअर केली आहे. (Sonalee Kulkarni emotional post for her grandmother,share navratrotsav memories)

सोनालीनं आपल्या दिवंगत आजीचं स्मरण करत नवरात्रीची केलेली पोस्ट मनाला स्पर्शून जाते. तिनं पोस्ट करताना आपल्या लग्नसोहळ्यातला आजीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आजीच्या गालाला गाल लावत लाड करुन घेणारी सोनाली आजीच्या किती जवळ होती हे या फोटोवरनं दिसत आहे. सोनालीनं नवरात्रीच्या शुभेच्छा देत आजी आपल्या घरी कशी घटस्थापना करायची आणि आपल्या आयुष्यात ती कायम आपली पहीली दुर्गा असेल असं तिनं म्हटलेलं आहे.

सोनालीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''आज घटस्थापना. माझी आजी घट बसवायची. आज ती नसली तरी मनाच्या देव्ह्यातल्या नवदुर्गां मधे पहिली जागा कायम तिचीच असेल. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा''. #माझ्यानवदुर्गा #पहिली #आजी #नवदुर्गा #देवी #sonaleekulkarni #navratri #special #navdurga #happynavratri #devi सोनालीच्या या भावूक पोस्टवर चाहत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तिचं सांत्वन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT