sonali kulkarni who played sulochana latkar in ani dr kashinath ghanekar movie emotional after her death  SAKAL
मनोरंजन

Sulochana Latkar: आणि मला अश्रू अनावर झाले... दीदींच्या निधनाने सोनाली कुलकर्णी भावुक

अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात सुलोचना दीदींची भूमिका सोनाली कुलकर्णीने साकारली.

Devendra Jadhav

Sonali Kulkarni Emotional Post On Sulochana Latkar Death: अनेक सिनेमांमधून आईची भूमिका साकारणाऱ्या आणि लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना लाटकर यांचं काल ४ मेला निधन झालं.

दीदींच्या निधनाने मराठीच नव्हेच तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टी हळहळली. सुलोचना लाटकर यांनी आजवर अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

अशातच दीदींची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने त्यांच्याविषयी भावुक पोस्ट केलीय.

(sonali kulkarni who played sulochana latkar in ani dr kashinath ghanekar movie emotional after her death)

अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात सुलोचना दीदींची भूमिका सोनाली कुलकर्णीने साकारली.


सोनाली अनेकदा सुलोचना दीदींना भेटली आहे. सोनालीच्या मनात दीदींबद्दल आदराचं स्थान आहे.

दीदींच्या निधनाची बातमी कळताच सोनालीने दीदींना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. अखेरचा हा तुला दंडवत अशी पोस्ट करत सोनालीने दीदींना श्रद्धांजली अर्पण केलीय.

याशिवाय एका मुलाखतीत सोनालीने जेव्हा तिला दिदींचा पहिल्यांदा फोन आला होता त्यावेळची अवस्था तिने सांगितली होती. सोनालीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिनेमात रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली होती.

त्यावेळी सुलोचना लाटकर यांचा सोनालीला फोन आला होता. सोनाली सांगते.. "पलीकडून आवाज आला, 'मी सुलोचना दीदी बोलतेय'. दीदींचा आवाज ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

त्यानंतर मी काहीच बोलू शकलो नाही. दीदी म्हणाल्या, ‘मी डॉ बाबासाहेब आंबेडकर (2000) मध्ये तुझा अभिनय पाहिला आणि मला तो खूप आवडला. असेच चांगले काम करत राहा',

असे आठवण सोनालीने सांगितली. या प्रसंगाची आठवण करताना सोनाली कुलकर्णीला अश्रू अनावर झाले होते.

सुलोचना लाटकर या 94 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार 5 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी आज अत्यंत दर्शनासाठी ठेवणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

सुलोचना दीदी त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT