Sonali Kulkarni,Kapil Sharma Google
मनोरंजन

'कपिल शर्मा शो' मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात...

रवी किशन आणि सचिन खेडेकर हे अभिनेतेही तिच्यासोबत प्रमोशनसाठी आले होते.

प्रणाली मोरे

'कपिल शर्मा शो'(Kapil Sharma) हा एक फॅमिली शो आहे. या शो मध्ये येणारी सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरसोबतच अनेक वेगळ्या विषयांवर गप्प मारतात ज्याला कपिल कॉमेडीचा मधनं-मधनं तडका देत असतो. आणि मग त्यांच्या सेटवर अगदी सेलिब्रिटीपासनं उपस्थित प्रेक्षकांपर्यंत सारेच हसून हसून लोटपोट होतात. कपिलच्या शो मध्ये बॉलीवूडमधली मोठमोठी नामवंत मंडळीच नाहीत तर क्रिकेटर्सनीही इथं हजेरी लावली आहे. आपल्या मराठीतल्याही काही हिट सिनेमांच्या टीमला कपिलनं आपल्या शो मध्ये बोलावलं होतं.

हा शो अनेकदा त्याच्या कॉन्टेन्टपेक्षाही गाजला तो वादांमुळे. मग कधी तो वादाचा मुद्दा कपिलनं निर्माण केला असेल,कधी शो मध्ये काम करणा-या इतर कलाकारांनी तर कधी शो मध्ये येणा-या सेलिब्रिटींनी. असो,आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत आला आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलीय आपल्या सिनेमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजलेली मराठमोळी सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni). आता सोनालीनं नेमकं असं काय केलंय की ज्यामुळे शो चर्चेत आलाय आणि सोनालीवरही तिचे चाहते नाराज झालेयत. असं ती नेमक काय बोललीय,कारण तिच्यासोबत त्या शो मध्ये रवी किशन आणि सचिन खेडेकर हे दोन अभिनेतेही उपस्थित होते. पण पुढे एक गोष्ट समोर आलीय ती अशी की सोनालीवर वादात पडण्याची वेळ आली तिच मुळी रवी किशनमुळे. आता यात काय नेमकं गौडबंगाल आहे ते पाहूया.

तर त्याचं झालं असं की कपिल शर्माच्या शो मध्ये आपल्या 'द व्हिसल ब्लोअर' या 'ओटीटी' वर प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सोनाली कुलकर्णी,रवी किशन आणि सचिन खेडेकर आले होते. तेव्हा रवी किशनसोबत काम केल्याच्या काही अशा आठवणी सोनालीनं शो मध्ये सांगितल्या की ज्यामुळे सोनाली आपसूक वादात ओढली गेली. ती म्हणाली,''मी रवी सोबत श्याम बेनेगलांच्या एका सिनेमात काम केलं आहे. त्यावेळी श्याम बेनेगेल यांनी फोन करून विचारताच मी रवी सोबत काम करायला उत्सुक असल्यामुळे लगेचच होकार दिला. त्या सिनेमात मी आणि रवी नवरा-बायकोचं पात्र साकारलं होतं''.

''एक इंटिमेट सीन होता. श्याम बाबू बोलले,'चल आता रवी वर उडी मार आणि पलंग तोडून टाक'. मी त्याक्षणी इतकी लाजले की मला काहीच सुचेना.पण रवी सोबत होता तर काम करताना मज्जा आली''. हे एवढं बिनधास्त सोनाली बोलून गेली खरी पण आता सोशल मीडियावर तिनं वक्तव्य केलेला हा व्हिडीओ वा-यासारखा पसरला आणि तिच्या फॅन्सनी तिच्यावर नाराजी दर्शवली. कारण हे बोलताना सोनाली लाजत-लाजत बोलली नाही पण बाजूला उभा रवी किशन मात्र त्या इंटिमेट सीनचा किस्सा ऐकून शरमेनं मान खाली घालून उभा होता. तर या व्हिडीओवर काही फॅन्सनी म्हटलंय की, 'हा नेमका फॅमिली शो च आहे नं'. तर काहींनी सोनालीच्या वक्तव्याला हसण्यावारी नेलंय. आता पहिल्यांदाच कपिलच्या शो मध्ये जाऊन वादाच्या चर्चेत उडी घेतलेल्या सोनालीला आपण उगाच काहीबाही बोलून गेलो असं तर वाटेत नसेल नं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT