Sonam kapoor and Anand ahuja with Anil kapoor go for a vacation,watch Video Google
मनोरंजन

Video: नातवाला घेऊन बग्गीतून फिरायला निघाले आजोबा अनिल कपूर; आई सोनमही बाळाला छातीला बिलगून दिसली

सोनम कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवर बाळाला पहिल्यांदाच बाहेर फिरायला नेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Sonam Kapoor Video: सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांनी याच वर्षी २० ऑगस्ट रोजी एका क्यूट मुलाला जन्म देत आई-बाबा होण्याचा आनंद अनुभवलाय. २०१८ मध्ये दोघांचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. सध्या दोघंही आपल्या मुलासोबत आपला नवा प्रवास एन्जॉय करत आहेत. सोनम कपूर एक आई म्हणून आपली जबाबदारी चांगली सांभाळताना दिसत आहे. (Sonam kapoor and Anand ahuja with Anil kapoor go for a vacation,watch Video)

आपल्या मुलासोबत सोनम कपूर आणि आनंद आहूजा पहिल्या व्हेकेशेनवर गेले आहेत. अर्थात या ट्रीपवर सोनमला तिचे वडील अभिनेते अनिल कपूर आणि सुनिता कपूर देखील जॉइन करणार आहेत. सोनम कपूरने खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत ज्यात ती आपल्या मुलासोबत दिसत आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

सोनम कपूर तिच्या लेटेस्ट रीलमध्ये मुलगा वायु कपूर आणि पती आनंद आहूजासोबत वेळ घालवताना दिसत आहे. या रीलमध्ये सोनम कपूर आनंद आहूजा आणि वायू सोबत रोड ट्रीपवर निघालेली दिसत आहे. लगेच पुढची झलक दिसतेय त्यात अनिल कपूर आपल्या नातवाला प्रेमानं फिरवताना दिसत आहेत. तर सोनम आपल्या लाडक्याला छातीशी घट्ट धरुन त्याच्यावर मायेचा वर्षाव करताना दिसत आहे.

सोनमच्या या व्हिडीओवर भूमी पेडणेकर,आलिया भट्ट,आनंद आहूजा आणि अथिया शेट्टी अशा अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सोनमने याआधी आपल्या मुलासोबत काही फोटो शेअर केले होते आणि त्याची जोरदार चर्चा रंगली होती. तिनं शेअर केलेल्या एका व्हिडीओत ती बाळाला ब्रेस्ट फीडिंग करतानाही दिसली होती.

सोनमनं या वर्षीच आपल्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिनं बेबी बम्प सोबत आपला फोटो शेअर करत आपण आयुष्यात एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करणार आहोत ही गूड न्यूज तिनं चाहत्यांना दिली होती. प्रेग्नेंसी दरम्यान तिनं केलेले फोटोशूटही भलतेच चर्चेत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT