Sonam Kapoor On Mumbai  esakal
मनोरंजन

Sonam Kapoor On Mumbai : 'काय ती मुंबईची अवस्था! मला तर...' सोनम कपूर बोलली, नेटकऱ्यांनी काढला जाळ

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonam Kapoor On Mumbai Pollution traffic syestem post viral : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आता तिनं पुन्हा एकदा मुंबईमधील बांधकामं आणि प्रदुषण यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

सोनमनं तिच्या ट्विटवर मुंबईमधील बांधकामं आणि प्रदुषण यावर पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणते, मुंबईमध्ये जी बांधकामं होत आहेत त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. जुहूवरुन बांद्र्याला जाण्यासाठी खूप वेळ लागतो आहे. मुंबईमध्ये प्रदुषण वाढते आहे. त्यामुळे वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. मला तर जुहूवरुन बांद्रा बँड स्टँडला जायला एक तास लागला.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हे सगळे मुंबईतील सतत होणारी बांधकामं आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे झाले आहे. असे मत सोनमनं नोंदवले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत जे काही होतं आहे त्याकडे कुणाचे लक्ष आहे की नाही असा प्रश्नही सोनमनं यावेळी तिच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. सोनमच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिचा क्लास घेतला आहे.

एकानं लिहिलं आहे की, मॅडम तुम्ही तर मर्सिडीज, रोल्स रॉईसमधून फिरता तेव्हा जी लोकं गर्दीतून लोकलमध्ये, कारमधून प्रवास करतात त्यांचा विचार जरा करा. रोज एवढया गर्दीतून आम्ही कसा प्रवास करतो आमचे आम्हाला माहिती तरीही आम्ही थांबत नाही. तुमच्या जवळ तर किती पर्याय आहेत तरीही का तक्रार करता?

दुसऱ्यानं लिहिलं आहे एवढं वाटतं तर सायकल घे आणि फिर..त्यावर बसून प्रदुषण कसे कमी करता येईल यासाठी लोकांना आवाहन कर. सायकलमुळे ट्रॅफिकमध्ये अडकून बसण्याचा प्रसंग येणार नाही आणि वेळही वाचेल. अशा प्रतिक्रिया सोनमला तिच्या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT