Sonam Kapoor  
मनोरंजन

Hijab Row: पगडी चालते हिजाब का नाही?सोनम कपूरचा प्रश्न...

कर्नाटकातील हिजाब वाद (Karnatak Hijab Controversy) हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hijab News: कर्नाटकातील हिजाब वाद (Karnatak Hijab Controversy) हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिजाबच्या वादानं देशातील वातावरण ढवळून काढले आहे. एका शाळकरी विद्यार्थीनीच्या व्हिडिओनं (Viral Video) साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर वेगवेगळ्या बॉलीवूड सेलिब्रेटींनी (Bollywood Celebrity) प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी दाक्षिणात्य सेलिब्रेटी कमल हसन, अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कंगना रनौत, शबाना आझमी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान बॉलीवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी देखील हिजाबवर दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा आहे.

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरनं इंस्टावरुन एक फोटोही शेयर केला आहे. त्या फोटोमध्ये एक पगडी घातलेला आणि दुसऱ्या फोटोमध्ये हिजाब परिधान केलेली महिला दिसत आहे. त्यावरुन सोनमनं आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त प्रतिक्रिया देणे, जे आहे त्याविषयी ठाम भूमिका घेणे यासाठी सोनम कपूरचं नाव घ्यावे लागेल. जर पगडी चालते तर हिजाब का नाही....असा प्रश्न सोनमनं विचारला आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. सोनम सध्या लंडनमध्ये असून तिच्यापर्यत देशातील सध्याच्या परिस्थितीविषयीचे अपडेट्स गेले आहेत.

देशामध्ये सध्या हिजाबवरुन वाद सुरु झाला आहे. अशावेळी बॉलीवूडमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. त्यात काही सेलिब्रेटींनी हिजाबचं समर्थन केलं आहे तर काहींनी तो नसावा अशी भूमिका घेतली आहे. यापूर्वी बॉलीवूडची क्वीन कंगनानं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. आपण स्वताला बंधनातून मुक्त करायला शिकलं पाहिजे. बंधनात अडकून ठेवता कामा नये. असं कंगना म्हणाली होती. त्यावरुन तिच्यावरही नेटकऱ्यांनी सडकून टीका केली होती. कर्नाटकातील प्रकरणाची उच्च न्यायालयानं दखल घेतली असून त्यांनी भारतीय संविधानाचा आधार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

Manglwedha Election : नगरपालिकेचा कारभार चालवताना पतीचा हस्तक्षेप होईलच कसा?– भाजप उमेदवार सुप्रिया जगताप!

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबाचा गृहिणीला १० लाखांचा गंडा

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT