Sonam Kapoor, Sonam Kapoor son, anand ahuja, Sonam Kapoor son vayu, sonam kapoor family SAKAL
मनोरंजन

Sonam Kapoor: किती गोड.. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी सोनमने शेयर केली मुलगा वायूची पहिली झलक

गेले अनेक दिवस सोनम आणि आनंद आहुजा अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचा मुलगा वायुची गोंडस झलक शेअर करतात, तथापि, ते वायूचा चेहरा मात्र लपवताना दिसतात.

Devendra Jadhav

Sonam Kapoor shares FIRST PIC of son Vayu News:

सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सोनमने सध्या बॉलिवूडमध्ये काम करणं कमी केलं असून ती संपूर्णतः संसारात लक्ष देतेय. या दोघांचे लग्न 8 मे 2018 रोजी झाले होते. या दोघांच्या लग्नाला आज 5 वर्षे झाली आहेत. सोनम आणि आनंद गेल्या वर्षी २०२२ च्या ऑगस्टमध्ये आई - बाबा झाले. या दोघांच्या मुलाचे नाव वायु. आज लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी सोनमने मुलगा वायूची पहिली झलक शेयर केलीय.

गेले अनेक दिवस सोनम आणि आनंद आहुजा अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचा मुलगा वायुची गोंडस झलक शेअर करतात, तथापि, ते वायूचा चेहरा मात्र लपवताना दिसतात. सोनम आणि आनंदच्या लग्नाच्या 5 व्या वाढदिशी, सोनमने शेवटी त्यांचा 8 महिन्यांचा मुलगा वायुचा पहिला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वायूची झलक दिसतेय.

सोनम कपूरने सोमवारी सकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाच्या 5 व्या वाढदिवशी तिचे पती आनंद आहुजा यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. पहिल्या काही फोटोंमध्ये सोनम आणि आनंद एकमेकांवर खूप प्रेम करताना दिसत आहेत. तिने गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्याचे रोमँटिक फोटो टाकले आहेत. पण या रोमँटिक फोटोच्या शेवटच्या चित्राने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आनंद आहुजा आपला मुलगा वायूसोबत काही वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. फोटोत वायुच्या चेहऱ्याची एक छोटीशी झलक दिसते.

या फोटोत वायू पांढर्‍या टी-शर्ट आणि बेज पँटमध्ये खूप गोंडस दिसतोय. आनंद आहुजा काळ्या रंगाच्या पोशाखात दिसतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय आहे! सोनम सुद्धा आई म्हणून खूप खुश दिसतेय. हे फोटो शेयर करून सोनम लिहिते., “आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज! दररोज मी माझ्या तारकांचे आभार मानते की, तुम्हाला माझा जीवनसाथी आणि सोलमेट म्हणून लाभले. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम 7 वर्षांसाठी धन्यवाद. हसणं, उत्कटता, दिलखुलास गप्पा, संगीत, प्रवास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुंदर वायूने ​​भरलेले. लव्ह यू माय जान.. मी कायमची तुझी मैत्रीण, जिवलग मित्र आणि पत्नी असेन, तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस खरोखरच अभूतपूर्व आहे! अशी पोस्ट लिहून सोनमने आनंद व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT