Sonam Kapoor took Progesterone shots  esakal
मनोरंजन

Sonam Kapoor: 37 व्या वर्षी झाली आई! बाळाला वाचविण्यासाठी सोनमनं चक्क...

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी म्हणून सोनम कपूरची ओळख नाही. तिनं आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

युगंधर ताजणे

Sonam Kapoor News; बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी म्हणून सोनम कपूरची ओळख नाही. तिनं आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ती बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. (Bollywood Actress) सोनम ही तिच्या आक्रमक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी तिनं केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या (bollywood Actor Anil Kapoor) रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिची प्रेग्नंसी. त्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अशावेळी तिनं जे केलं ते ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

काही महिन्यांपूर्वी सोनमनं गुड न्युज दिली होती. त्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला. यंदाचे वर्ष बॉलीवूड सेलिब्रेटींच्या गुड न्युजचे आहे. चालु वर्षी अलिया भट्ट, बिपाशा बसु, अंकिता लोखंडे या सेलिब्रेटींनी गुड न्युज दिल्या आहेत. सोनमनं आपल्याला हा काळ अतिशय कठीण वाटत असून त्याला सामोरं जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर व्हावं लागलं असं तिनं म्हटलं आहे. वाढतं वय आणि त्यानंतर घेतलेला प्रेग्नंसीचा निर्णय यामुळे मला मात्र मोठ्या वेदानांना पार करावं लागलं असं सोनमनं म्हटलं आहे. सोनमच्या घरी 20 ऑगस्टला नव्या पाहूण्याचे आगमन झाले. सोनमचा पती आनंद अहुजा आणि परिवारानं त्यांचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं.

सोनम आणि तिचा मुलगा आता दोघेही सुखरुप आहेत. मात्र त्याला जन्म देताना आपल्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागल्याचे तिनं म्हटलं आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये यासगळ्या गोष्टींविषयी सांगितले होते. सोनम कपूरनं काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध फोटो मॅगझीनसाठी फोटोशुट केलं. त्याला तिच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला. सोनम म्हणते मला प्रेग्नंसीच्या वेळी अनेक कॉम्प्लिकेशनचा सामना करावा लागला. त्यावेळी मी लंडनमध्ये होती. त्याठिकाणी कोरोनाचं वातावरण होतं. परिस्थिती चिंताजनक होती.

काही दिवसांनी परिस्थिती सुधारली. मी आणि आनंदनी मिळुन विचार केला. बाळाला जन्म द्यायचा. आपण दिसायला तरुण दिसतो मात्र तुमचं शरीर त्या प्रेग्नंसीसाठी पुरक असावं लागतं. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मला बाळाला वाचविण्य़ासाठी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन्स घ्यावी लागली होती. वाढतं वय मला खूप वेदना देणारा होता. अनेक इंजेक्शन्स घेतल्यानं मला आणखी त्रासाला सामोरं जावं लागलं. पण बाळाला सुखरुप जन्म देण्यासाठी हे गरजेचं होतं. असं सोनमनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT