Sonu Nigam
Sonu Nigam esakal
मनोरंजन

Sonu Nigam : 'सेल्फीला नाही म्हटल्यावर तुम्ही काहीपण...' सोनू निगमचा संताप!

सकाळ डिजिटल टीम

Sonu Nigam bollywood singer attacked : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झाला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली. सोशल मीडियावर त्या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता यासगळ्यात सोनू निगमचे ट्विट व्हायरल झाले आहे आहे. त्यानं त्यात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

सोनूचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो स्टेजवरुन खाली येत असताना अचानक झालेल्या धक्काबुक्की करण्यात आली. त्यात तो तोल जाऊन पडला. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये सोनूला धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेमध्ये सोनूला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. त्याच्या सोबत असणाऱ्या रब्बानी खानला या घटनेत दुखापत झाली आहे.

सोनूला जी धक्काबुक्की करण्यात आली ती उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे आमदार यांच्या मुलानं केली. असा आरोप पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्याच्याविरोधात सोनूनं पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हे सगळं प्रकरण सेल्फीमुळे घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर आता सोनूचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सोनूनं म्हटले आहे की, धक्काबुक्की झाली बाकी काही नाही. मी आता संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आपण काय करतो, कसे वागतो, गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यायला हवी यासाठी मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तुम्हाला जबरदस्तीनं सेल्फी हवा असतो. तो कसा काय शक्य आहे, बर तो फोटो दिला नाही तर तुम्ही दादागिरी पण करता असं कसं चालेल हा प्रश्न सोनूनं यावेळी उपस्थित केला आहे. त्याच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मला सेल्फीसाठी विचारणा करण्यात आली. मी नाही म्हटल्यावर समोरच्यानं मला पकडले. ज्यानं पकडले तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील होता. त्यानंतर मला वाचविण्यासाठी माझे सहकारी हरि प्रसाद मध्ये आले. त्यानं हरि यांना देखील धक्का दिला. त्यानंतर त्यानं मलाही धक्का दिला. मला वाचविण्यासाठी रब्बानी मध्ये पडले. त्यांनाही धक्का देण्यात आला. ते गंभीर जखमी झाले आहेत.

२० फेब्रुवारी रोजी आमदार फटेरपेकर यांच्यावतीनं चेंबूरमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रकाश यांच्या मुलानं सोनूचा मॅनेजर सायरा सोबत बेशिस्तपणे वर्तन करत त्यांना स्टेजवरुन बाजूला होण्यास सांगितले. त्याचवेळी सोनू जेव्हा स्टेजवरुन खाली येत होता त्यावेळी त्यानं सोनूसोबत सेल्फी घेण्यासाठी त्याला विचारणा केली. सोनूनं त्याला नकार दिला, त्याचा राग ठेवून त्यानं सोनूला ढकलले. असे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना डीसीपी हेमराज राजपूत यांनी म्हटले की, सोनूच्या तक्रारीनुसार स्वप्नील फातर्पेकरच्या विरोधात कलम ३४१, ३३७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT