Sonu Nigam Has Skipped Watching The Kashmir Files For Personal Reasons, Here’s What He Said! google
मनोरंजन

'द काश्मिर फाईल्स' पाहणं सोनू निगम टाळतोय; कारणं सांगत केला मोठा खुलासा

बॉलीवूडकरांनी द काश्मिर फाईल्सचं तोंडभरून कौतूक केलं असताना सोनू निगमनं हा सिनेमा का पाहिला नाही याचा खुलासा केलाय.

प्रणाली मोरे

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमाची भारतभरात चांगली चर्चा झाली. सिनेमावरनं अनेक वाद रंगले पण बॉक्सऑफिसवर सिनेमानं चांगलीच कमाई केली. सिनेमागृहात अनेकांनी हा सिनेमा पहायला गर्दी केलेली आपण पाहिलीच असेल पण अजूनही ज्यांना थिएटरमध्ये जाणं जमलं नाही ते सिनेमा ओटीटी वर कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत. बॉलीवूडच्या दिग्ग्जांनी देखील सिनेमाचं कौतूक तोंडभरून केलं. करण जोहर,वरुण धवन,अभिषेक बच्चन,आमिर खान या सर्वांनी सिनेमाची प्रशंसा केली आहे. पण गायक सोनू निगमनं(Sonu Nigam) मात्र अद्याप 'द काश्मिर फाईल्स' पाहिलेला नाही.

सोनू निगमने 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा का पाहिला नाही याचं कारणही सांगितलं आहे. सोनू निगम म्हणे काश्मिरी पंडितांची ती विदारक कहाणी ऐकून खूप भावूक झाला आणि त्याला त्याचे अश्रू आवरले नाहीत. टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला,''मी अद्याप 'द काश्मिर फाईल्स' पाहिली नाही. यामागे पहिलं कारण आहे की जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा मी दुबईत होता आणि सिनेमा तिथे प्रदर्शित केला गेला नाही. आणि जेव्हा मी भारतात आलो तेव्हा माझी सिनेमा पाहण्याची हिम्मतच झाली नाही एवढं मी सिनेमातील कथानकाविषयी इतरांकडून ऐकलं''.

सोनू निगम पुढे म्हणाला,''आता मी फक्त सिनेमाविषयी बोलतोय तरी मला रडायला येत आहे. हे केवळ काश्मिरबाबतीतच नाही तर मी असाही खूप भावूक आहे. मला इतरही कोणाबाबत काही चुकीच,दुःखद घडलं तर सहन होत नाही. म्हणूनच मी हा सिनेमा पाहण्याची हिम्मतच केली नाही''. सोनू निगमनं या मुलाखतीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. तो म्हणाला,''मी अरविंद केजरीवाल यांचं भाषण ऐकलं. ते त्या भाषणात काश्मिरी पंडितांची खिल्ली उडवत होतो. बीजेपीवर विनोद करीत होते, मला यासंदर्भात त्यांना काही बोलायचं नाही. पण काश्मिरी पंडितांवर त्यांचं बोलणं मला पटलं नाही''.

सोनू निगम म्हणाला,''अरविंद केजरीवाल म्हणाले असत्य घटना दाखवणाऱ्या सिनेमाचं स्वतःचा हेतु साधण्यासाठी प्रमोशन केलं जात आहे. ते ऐकताना खूप विचित्र वाटलं. असं असेल तर मग लोक सिनेमा पाहून रडत होते ते सिनेमात खोटं दाखवलं आहे म्हणून रडत होते का? काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाला तेव्हा बीजेपीनं काय केलं. तुम्ही जेव्हा स्वतः बोलताय की अत्याचार झाला आणि मग दुसरीकडे विधानसभेत बोलता सिनेमात खोटं दाखवलं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT