sonu sood 
मनोरंजन

सोनू सूद बनला टॉप ग्लोबल एशियन सेलिब्रिटी २०२०, वाचा पूर्ण लिस्ट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचं नाव गेल्या कित्येक महिन्यांंपासून अनेकांच्या तोंडावर आहे. लॉकडाऊन दरम्यान सोनूने कित्येकांना मदत करुन आपलंसं केलं होतं. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे लोकांना त्याला रिल हिरोपासून रिअल हिरोचा दर्जा दिला. नुकतीच त्याची २०२० च्या नंबर एक एशियाई व्यक्तीच्या रुपात निवड झाली. कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटींना मागे टाकत त्याने हा सन्मान मिळवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, युके स्थित ईस्टन आय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित ५० एशियाई सेलिब्रिटींमध्ये सोनू सूदने पहिलं स्थान मिळवलं आहे. या सूचीच्या माध्यमातून त्या कलाकारांना सन्मानित केलं गेलं आहे ज्यांनी आपल्या कामाने समाजात सकारात्मक छबी निर्माण केली आहे आणि लोकांना प्रेरणा दिली आहे.

हा सन्मान मिळाल्यावर सोनू सूदने आभार व्यक्त करत म्हटलं आहे की, ''माझ्या प्रयत्नांची जाणीव ठेवल्याबद्दल ईस्टन आय धन्यवाद. जशी ही रोगराई आली मला असं वाटलं की माझ्या देशवासियांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही एक अशी गोष्ट होती ज माझ्या आतल्या मनातून आली. मी जे केलं ते एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी होती आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन.''

ईस्टरर्न आयचे संपादक असजद नसीर यांनी लीस्ट तयार केली. त्यांनी सांगितलं की सोनू सूदचा यावर हक्क आहे कारण लॉकडाऊनमध्ये दुस-यांची मदत करण्यासाठी कोणा इतर व्यक्तीने असं काम केलेलं नाही. या लिस्टमध्ये सिनेमा, संगीत आणि फॅशनच्या कॅटगरी व्यतिरिक्त इतर भारतीयांचा देखील समावेश आहे.   

sonu sood becomes top global asian celebrity 2020 see list

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

SCROLL FOR NEXT