sonu sood
sonu sood file image
मनोरंजन

'फादर्स डे'चा 'तो' व्हिडीओ खोटा; सोनू सूदने केला खुलासा

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सोनू सूद (sonu sood) त्याच्या सामाजिक कार्यामुळे सध्या चर्चेत आहेत. नुकतीच फादर्स डेनिमित्त (father's day) त्याने मुलगा इशांतला 3 कोटी रुपयांची आलिशान गाडी भेट म्हणून दिली अशी चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर सोनू आणि त्याच्या कुटुंबाचा गाडी पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पत्नी सोनाली आणि मुलगा इशांतसोबत सोनू या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुलगा इशांतला त्याने काळ्या रंगाची Mercedes-Maybach GLS600 ही कार दिल्याचं या व्हिडीओत दाखवले गेले. त्या गाडीच्या कंपनीमधील एक कर्मचारी त्यांना गाडीचे सर्व वैशिष्ट्ये सांगताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओवर आता सोनूने प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. (sonu sood give reaction on gifting luxury car to son on fathers day)

सोनू या व्हिडीओबद्दल म्हणाला, 'आम्ही फक्त त्या गाडीचा ट्रायल करायला गेलो होतो. मी माझ्या मुलासाठी भेट म्हणून ती गाडी घेत आहे, ही बातमी खोटी आहे.आम्ही फक्त टेस्ट ड्राइव्हसाठी गेलो होतो. आम्हाला ती गाडी घ्यायची नाही. मला कळाले नाही की यामध्ये फादर्स डेचा अँगल कसा काय आला? माझ्या मुलांसोबत वेळ घालवणे हेच माझ्यासाठी लग्जरी गिफ्ट आहे. जे मी त्यांना देऊ शकतो.'

सोनू सूदकडे इतरही आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. ऑडी Q7, मर्सिडीज बेंज एमएल क्लास, Porsche Panamera या गाड्यासुद्धा सोनू सूदकडे आहेत. सोनूच्या कोराना काळातील सामाजिक कार्याचे सर्व जण कौतुक करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यानं कोरोनाग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यात त्यानं रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर, औषधे उपलब्ध करुन देणे यांसारखी महत्वाची कामं केली होती. तसेच अनेक मजूरांना त्यांच्या घरी परतण्यास मदत केली. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT