sonu sood 
मनोरंजन

हजारो स्थलांतरित मजुरांची मदत करुन अभिनेता सोनू सूद ठरलाय 'हा' पुरस्कार मिळवणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांसाठी देवमाणुस ठरला. जवळपास २० हजारपेक्षा जास्त मजुरांना घरी पोहोचवल्यानंतर सोनू सूदने दिवस रात्र एक करुन गरजु आणि गरीब लोकांना मदत केली. सोनू सूदची ही माणुसकी पाहून त्याला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP) कडून मानवतेच्या आधारावर सन्मानित केलं गेलं आहे.

सोमवारी संध्याकाळी ऑनलाईनच्या माध्यमातून सोनू सूदला सन्मानित केलं गेलं. सोनू सूदच्या आधी  हा पुरस्कार मिळवणा-यांच्या यादीमध्ये एंजेलीना जोली, डेविड बेकम, लिओनार्डो दी कॅप्रिओ, एम्मा वॉटसन यांचा समावेश आहे. हा एक अतिशय सन्मानित पुरस्कार आहे जो सोनू सूदला देण्यात आला आहे.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महानायक अमिताभ बच्चन, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, प्रसिद्ध गायक आयुष्मान खुरानाने देखील यूनिसेफसाठी खूप काम केलं आहे. मात्र त्यांना अजुनपर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही. बॉलीवूडमधील सोनू सूद हा पहिलाच अभिनेता आहे ज्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 

केवळ सोनू सूदंच नाही तर संपूर्ण देश त्याच्या या सन्मानाचा आनंद साजरा करत आहे. सोशल मिडियावर सोनूला शुभेच्छा देणा-यांचा पाऊस पडतोय. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोनूने देखील त्याचा आनंद व्यक्त केला. सोनूने म्हटलंय, हा पुरस्कार खूपंच खास आहे. माझ्याकडून जे शक्य होतं तेच मी केलं मात्र अशा प्रकारचा सन्मान मिळणं ही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. 

कित्येक ब्रँड्सनी आता सोनूला त्यांच्यासाठी साईन केलं आहे. एकीकडे बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणात चर्चेत आहेत तर दुसरीकडे सोनू त्याच्या उत्तम कामगिरीमुळे सगळ्यांचं मन जिंकत आहे.   

sonu sood got global humantarain award by undp  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT