Sonu Sood  file photo
मनोरंजन

रिजेक्ट केलेल्या मॅगझिननेच आज कव्हरपेजवर दिलं सोनू सूदला स्थान

मॅगझिनसाठी सोनू सूदने दिलं होतं ऑडिशन

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने Sonu Sood गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये अनेक गरीब मजुरांना मदत केली होती. तसेच तो सध्या कोरोना रुग्णांना वैद्यकिय सुविधा पुरवत आहे. त्याच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. नुकतेच सोनूने एका मासिकेच्या कव्हर पेजचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'स्टारडस्ट' Stardust या मासिकेच्या कव्हर पेजवर सोनू सूद झळकला आहे. त्याच कव्हर पेजचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि या मासिकेबद्दलची एक खास आठवण सोनूने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली. (Sonu Sood got rejected when he once auditioned for a Stardust magazine shoot he is now on its cover)

प्रसिद्ध मासिक स्टारडस्टच्या एप्रिल महिन्याच्या अंकामध्ये कव्हर पेजला सोनूचा फोटो आहे. सोनूला त्याचा हो फोटो पाहून या मासिकाबद्दलच्या जुन्या आठवणी आठवल्या. सोनूने त्याबद्दल ट्विट केले, 'एकदा मी पंजाबवरून माझे काही फोटो स्टारडस्ट मासिकेच्या ऑडिशनसाठी पाठवले होते. पण त्यांनी मला नाकारलं होतं. आज त्याच मासिकेने माझा फोटो छापल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.'

कोरोना काळातील सोनूच्या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनूने सोशल मीडियावर गरजू लोकांसाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तो म्हणाला, 'आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. जर त्यासाठी विलंब होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT