sonu sood 
मनोरंजन

अभिनेता सोनू सूद चाहत्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च करत पुन्हा बनला देवदूत

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी नियमावली जाहीर करत अजुन लॉकडाऊन सुरु आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांची मनं जिंकून खरा हिरो ठरला आहे तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. अनेक गरजुंना मदत करण्यासाठी सोनूने मदतकार्य हाती घेतले आहे. सोनूचं हे मदतकार्य गेले कित्येक महिने अहोरात्र सुरुच आहे. नुकतंच सोनूने पुन्हा एका गरजुला अशीच मदत केली असून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचचला आहे. 

अमनजीत  नावाचे गरजु गेल्या १२ वर्षापासून शारीरिक समस्यांमुळे त्रस्त होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं. अभिनेता सोनू सूदला जेव्हा अमनजीत यांच्या समस्येविषयी समजलं तेव्हा त्याने लगेचच त्यांना मदतीचा हात पुढे केला. यासंदर्भात अमनजीत यांच्या डॉक्टरांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

डॉक्टरांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “अमनजीत यांची प्रकृती आता स्थिर आहे. तब्बल ११ तास त्यांच्यावर न्युरो सर्जरी करण्यात आली. सोनू सूद यांनी लगेचच आमच्याशी संपर्क केला आणि मदत केली. इतकंच नाही तर शस्त्रक्रियेनंतरही त्यांनी चौकशी केली.त्यामुळे त्यांचे मनापासून आभार''.  

अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये कित्येक ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं देशात, परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं. पूरग्रस्त, शेतकरी, आजारी लोक अशा अनेकांना सोनूने आत्तापर्यंत मदत केली आहे. सोनूचं हे अथक कार्य सगळ्यांना अचंबित करणारं असून त्याला या सगळ्या गरजुंनी मनापासून आशिर्वाद देत ख-या आयुष्यातला हिरो मानलं असून देवदूताची उपमा दिली आहे.  

sonu sood helps amanjeet for his meticulous neurosurgery  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT