sonu sood 
मनोरंजन

सोनु सूदच्या आगामी सिनेमाची घोषणा, अमिताभ यांनीही दिल्या शुभेच्छा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सोनु सूदचं कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गरजुंची मदत केल्यामुळे खूप कौतुक झालं होतं. या संकटकाळात सोनु अनेकांसाठी देवदुत बनला होता. त्याने त्याच्या परिने हजारो लोकांची मदत केली. आजही या कार्यात सोनु मागे हटलेला नाही. सोनुच्या या कामाचा सकारात्मक परिणाम केवळ त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरंच नाही तर त्याच्या करिअरवरही झाला आहे. सोनु सूद याआधी अनेकदा खलनायकांच्या भूमिकेत दिसायचा मात्र त्याच्याजवळ अनेक सकारात्मक भूमिकांच्या ऑफर्स येत आहेत. 

सोनु सूदशी संबंधित आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सोनु राज शांडिल्य यांच्या आगामी 'किसान 'या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. आयुष्मान खुरानाचा सिनेमा 'ड्रीम गर्ल'चं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राज शांडिल्य या सिनेमा संबंधित ट्विट करुन अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलंय, 'हमारे किसान, देश की शान. माझ्या आगामी सिनेमाची घोषणा करत आहे. सिनेमात सोनु सूदची मुख्य भूमिका आहे. ईश्वर निवास या सिनेमाचं दिग्दर्शन करेल. राज शांडिल्य या सिनेमाची निर्मिती करतील.'

या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी सिनेमाशी संबंधित कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी यांनी ट्विट करत म्हटलंय, 'ईनिवास द्वारे दिग्दर्शित आणि सोनु सूद स्टारर किसान सिनेमाला खूप शुभेच्छा.'

'किसान' या सिनेमातील इतर कलाकारांबाबत अजुन माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच सोनु सूदचं पुस्तक 'मै मसीहा नही हूं' लॉन्च झालं होतं. सोनुने या पुस्तकामध्ये लॉकडाऊन दरम्यान त्याला आलेले अनुभव शेअर केले आहेत. 

  sonu sood to play lead role in raj shaandilya next film kisaan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT