अभिनेता सोनू सूदच्या Sonu Sood फाऊंडेशनने एका गरजू रुग्णासाठी बेडची व्यवस्था करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधलाच नाही, परंतु त्याचं श्रेय त्यांनी घेतलं, असं ट्विट गंजमच्या जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं. या आरोपानंतर सोनू सूदने स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केल्याचा दावाच केला नसल्याचं सोनूने स्पष्ट केलं. यासोबतच त्याने ऑक्सिजन बेडच्या शोधात असलेल्या एका व्यक्तीसोबतचा व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला. सोनू सूद त्याच्या फाऊंडेशनद्वारे गरजू रुग्णांना विविध वैद्यकीय सुविधा पुरविण्याचं काम करत आहे. (Sonu Sood provides proof after he was accused of taking undue credit for arranging hospital bed)
नेमकं काय आहे प्रकरण?
सोमवारी गंजमच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करण्यात आले की, 'आमचा सोनू सूद किंवा त्याच्या फाऊंडेशनशी कोणताच संपर्क झाला नाही. संबंधित रुग्ण हा घरीच आयसोलेशनमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे. बेडची समस्या नाही, ब्रह्मपूर कॉर्पोरेशन त्याविषयी काम करत आहे.' या ट्विटमध्ये सोनूच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही होता, ज्यात त्याने लिहिले होते की रुग्णाची मदत करण्यात आली आहे आणि बेडची व्यवस्था केली गेली आहे.
सोनू सूदचं उत्तर-
'सर तुमच्याशी संपर्क साधल्याचा दावा आम्ही केलाच नाही. गरजू व्यक्तीने आमच्याकडे मदत मागितली आणि आम्ही त्याच्यासाठी बेडची व्यवस्था केली. तुमच्या माहितीकरता चॅटचा स्क्रीनशॉट जोडत आहे. तुमचं कार्यालय खूप चांगलं काम करत आहे आणि आम्ही संबंधित व्यक्तीची मदत केली आहे, हे तुम्ही पुन्हा तपासून पाहू शकता. त्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक तुम्हाला पाठवला आहे', असं उत्तर सोनूने दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.