sonu sood on ajay - sudeep twit war  sakal
मनोरंजन

'भारतात फक्त एकच भाषा' : अजय- सुदीप वादावर सोनू सूद

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून सुरु झालेल्या कलाकारांच्या वादात आता अभिनेता सोनू सूद यानेही महत्वाचे विधान केले आहे.

नीलेश अडसूळ

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलीवूड स्टार अजय देवगण यांच्यात सुरु झालेला वाद वाढतच चाललेला आहे. या वादात कलाकारांनी आपले विचार व्यक्त करून हा वाद मिटवला असला तरी यावर विविध मते व्यक्त केली जात आहेत. आता अभिनेता सोनू सूद यानेही आपले मत मांडले आहे. सोनू सूद (sonu sood) अभिनेता म्हणून उमदा आहेच शिवाय माणूस म्हणूनही तो समृद्ध आहे. अनेक सामाजिक कामात त्याचा सहभाग असतो. तसेच सामाजिक, राजकीय विषयांवर तो कायमच आपले विचार मांडत आला आहे.

अभिनेता सुदीपने (kichcha sudeep) एका चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. बॉलीवूड मधील कित्येक चित्रपट आहे तेलगू आणि तामिळ चित्रपटामधून प्रेरित होऊन केले जातात' असे विधान केले होते. हे विधान अजय देवगण (ajay devgan) याला चांगलेच खटकले.“माझ्या भावा, तुमच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन.” असे ट्विट अजयने केले. या ट्विटमध्ये त्याने सुदीपलाही टॅग केले होते.

अजयच्या त्या ट्विटवर सुदीपनेही उत्तर दिले. 'अजय देवगण सर, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला. पण मला जे म्हणायचं आहे ते कदाचित मी तुम्हाला भेटून अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता किंवा कोणत्याही वादाला सुरुवात करायची नव्हती. मी तसं का करेन सर..' असे ट्विट सुदीपने अजयला उद्देशून केले आहे.

'सर, मी आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर करतो. हा विषय इथेच थांबावा अशी माझी इच्छा आहे, कारण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. तुम्हाला नेहमी खूप प्रेम आणि शुभेच्छा. लवकरच भेटूया..' असेही सुदीपने म्हंटले आहे. तर अजयनेही यावर व्यक्त होणे पसंत केले आहे,“तू माझा मित्रआहेस. आपल्यातील गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच चित्रपटसृष्टी एक आहे असा विचार करतो. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि प्रत्येकाने आमच्या भाषेचाही आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित, भाषांतरात समजून घेण्यात चूक झाली असावी.”असे उत्तर अजयने दिले आहे. तर 'भाषांतरामुळे एखादी गोष्ट चुकीची समजली जाते. त्यामुळेच संपूर्ण प्रकरण जाणून घेणे गरजेचे आहे. मी तुम्हाला दोष देत नाही. कारण एका चांगल्या विषयावर संवाद साधण्यासाठी तुम्ही मला ट्विट केले याचा आनंद अधिक आहे. असे सुदीपने म्हंटले आहे.

या वादात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, अनुप जलोटा यांनीही आपली मतं व्यक्त केली. आता अभिनेता सोनू सूदनेही या वादात उडी घेतली आहे. (Sonu Sood REACTS to Ajay Devgn and Sudeep's debate) एका माध्यमाशी बोलताना तो म्हणाला,“हिंदी ही केवळ राष्ट्रभाषा आहे, असे मला वाटत नाही. किंबहुना भारतात एकच भाषा आहे, ती म्हणजे मनोरंजन. तुम्ही कोणत्या प्रांतातून आहात, हे इथे महत्त्वाचे नसते. तुम्ही लोकांचे मनोरंजन केले तर ते देखील तुमच्यावर प्रेम करतात आणि आदराने तुमचा स्वीकारही करतात.” सोनूच्या या उत्तरावर चाहते खुश झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

Mumbai News : दोन हजार कोटींचा नफा; तरीही साडेसात हजार कोटी द्या! सीमा नाके बंद करण्यावरून ‘अदानी’ची अजब मागणी

Devendra Fadnavis on Vice President Election Result : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालावरून फडणवीसांनी विरोधकांना लगावला टोला!

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT