Sonu Sood Google
मनोरंजन

Sonu Sood: कार अपघातातील जखमी तरुणांना अभिनेत्याने असं दिलं जीवनदान

पंजाबनजीकच्या मोगा-बठिंडा रस्त्यावर हा अपघात झाला होता.

प्रणाली मोरे

गरिबांचा तारणहार म्हणून बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ओळखला जातो. सोनूनं पुन्हा माणूसकीचा धर्म जपत पंजाबमध्ये एका तरुण मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्याचं झालं असं की, अपघातात जखमी झालेले दोन तरुण त्यांच्या कारमध्ये अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी तोपर्यंत कुणीही फिरकलं नव्हतं. तेव्हा सोनूची गाडी तिथनं जात असताना त्याचं लक्ष त्या अपघातग्रस्त गाडीकडे गेलं तेव्हा त्यानं आपली गाडी थांबवून त्या मुलांची मदत करण्यासाठी त्या दिशेने धाव घेतली. सोनूने सर्वप्रथम गाडीतील जखमी मुलांना बाहेर काढलं,त्यानंतर स्वतः त्या मुलांना उचलून आपल्या गाडीत ठेवलं. व तिथनं थेट हॉस्पिटल गाठलं. वेळेवर मदत मिळाली म्हणून त्या मुलांचे प्राण वाचले आणि त्यांच्यावरचा धोका टळला.

हा अपघात पंजाबनजीकच्या मोगा-बठिंडा रस्त्यावर झाला होता. रात्री उशिरा त्या तरुणांसोबत हा कार अपघात झाला होता. समोरासमोरुन भरधाव येणाऱ्या दोन कार एकमेकांवर आदळल्यानं हा अपघात झाला होता. पण ही टक्कर इतकी जबरदस्त होती की त्या तरुणांच्या गाडीचे सेंटर लॉक लागले गेले. त्यामुळे गाडीच्या आत ते दोन तरुण फसले. त्या तरुणांचे नशीब चांगलं होतं की सोनू सूदची गाडी तिथनं पास होत होती आणि त्यानं अपघात पाहिल्यावर गाडी थांबवली हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं. सोनूने क्षणाचाही विलंब न करता किंवा आपल्याला दुखापत होईल याचा विचार न करता गाडीची काच तोडली अन् त्या गाडीतील जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेले.

सोनू आपल्या बहिणीच्या निवडणूक प्रचार फेरीनंतर पुन्हा मुंबईला परत जात होता. त्याचवेळी हा अपघात त्याच्या निदर्शनास आला. सोनूनं वेळीस मदत केल्यानं ते तरुण वाचले याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. आणि सोनूच्या कामाचे कौतूकही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT